बाणेर बालवाडी परिसरात लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने "समर शॉपिंग फेस्टिवल"चे आयोजन

बाणेर बालवाडी परिसरात  लहू बालवाडकर सोशल वेलफेअरच्या वतीने "समर शॉपिंग फेस्टिवल"चे आयोजन


 पुणे: हिंजवडी आय. टी. जवळील बाणेर बालेवाडी परिसर आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून झपाट्याने विकसित झाला आहे. या परिसरातील लोकांच्या रोजच्या जीवनातील गरज लक्षात घेऊन लहू बालवडकर सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून बालवाडीत ११ आणि १२ मार्च दरम्यान "समर शॉपिंग फेस्टिवल"चे आयोजन करण्यात आलय. या ठिकणी एकाच छताखाली सर्वाना आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. हा फेस्टिव्हल बालवाडी येथील, दसरा चौकातील, आठवडे बाजार ग्राउंडवर सकाळी ११. ३० ते रात्री ९.३० पर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे. बाणेर-बालेवाडीकरांना मनसोक्त खरेदी आणि लज्जतदार पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली दोन दिवस मिळणार आहे. 

"समर शॉपिंग फेस्टिवल"च्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्या महिला आणि व्यावसायिकांना एकत्र करत लहू बालवाडकर सोशल वेल्फेअर हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. तसेच व्यवसायावर असणाऱ्या कुटुंबांना आपल्या स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना हातभार लावण्याचेही काम लहू बालवाडकर सोशल वेल्फेअर करत आहे. आपल्या स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना हातभार लावण्याचा या मागचा हेतू आहे.

या "समर शॉपिंग फेस्टिवल" मध्ये प्रामुख्याने बनारसी साड्या, चंदेरी साड्या, कांजीवरम, पैठणी, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, पंजाबी सूट्स, प्लाझो, फाब्रिक डिझाईनर साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, खान्देशी केळीचे वेफर्स, शेंगदाणा गुळपट्टी, शोभेच्या वस्तू, सोलापुरी चादर, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, लोणच्यांचे विविध प्रकार, दर्जेदार गावरान आणि घरगूती मसाले, पापड कुर्डाई, शोभेच्या वस्तू, रेडी टू कुक फूड्स, मातीची भांडी, बेडशीट असे स्टॉल असणार आहेत. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला भेट देत असतात. या मध्ये स्टॉल हवा असल्यास ९८५०३०४१६६ या नंबर वर संपर्क करावा. या माध्यमातून नक्कीच आपल्या व्यवसायाला बाणेर-बालेवाडी परिसरातून चालना मिळेल.

उद्योजकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी बिजनेस प्रोमोट करण्याची सुवर्णसंधी

हिंजवडी आय. टी. जवळील बाणेर बालेवाडी परिसर आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून झपाट्याने विकसित झाला आहे. या परिसरातील लोकांच्या रोजच्या जीवनातील गरज लक्षात घेऊन बाणेर-बालेवाडीकारणांसाठी खास "समर शॉपिंग फेस्टिवल"चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून व्यावसायिकांसाठी बाणेर-बालेवाडी परिसरात बिझिनेझ प्रोमोट करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आपणही आपला बिझनेस या लोकांपर्यंत या फेस्टिवलच्या माध्यमातून पोहचवू शकता. तसेच या पुढेही ऑनलाईन सेवा देऊ शकता तरी या फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी  ९८५०३०४१६६ या नंबर वर संपर्क करावा.

लहान मुलांसाठी खास आकर्षण

या फेस्टिव्हल मध्ये लहान मुलांसाठी खास आकर्षण असणारे लांब पायाचे स्टिल्ट वॉकर, आणि जोकर यांची लहान मुलांच्या करमणुकीसाठी तसेच जम्पिंग आणि किड्स बॉऊन्सिंग टोटली फ्री असणार आहे. त्याच बरोबर थोरामोठांसाठी "ये शाम मस्तानी" हा सदाबहार गाण्यांचा प्रोग्रॅमही असणार आहे. झुंबा डान्स, बॉलीवूड डान्स" अश्या ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.