आळंदी : खेड तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी कामकाजात केलेल्या भ्रष्टाचाराबाबत खेड तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीच्या वतीने पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब चौधरी यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांना शासनाने निलंबित केले .या अनमोल कामगिरीबद्दल बाळासाहेब चौधरी यांचा व तसेच हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अर्जुन मेदनकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मेदनकर यांचा खेड तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीच्या वतीने सत्कार पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ टाकळकर व तालुका अध्यक्ष प्रकाश पाचारणे यांचे हस्ते करण्यात आला.
खेड तालुक्यातील आदर्श वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांना त्यांचे आरोग्य क्षेत्रात केलेल्या आरोग्यदायी भरीव लक्षवेधी कार्याबद्दल सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. उत्कृष्ठ आरोग्य सेवा दिल्या बद्दल त्यांचा आळंदी शहर समिती, खेड तालुका व पुणे जिल्हा समितीचे वतीने जिल्हा अध्यक्ष श्री सुरेशभाऊ टाकळकर यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आहे. यावेळी सदस्य लक्षमण आरूडे, बापूसाहेब नगरकर, समितीचे सचिव सतीश चांभारे ,दि॓डी मालक माधव रणपिसे, आळंदी शहर समिती अध्यक्ष श्री अर्जुन मेदनकर, श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष श्री राहुल चव्हाण, पत्रकार महादेव पाखरे, अविनाश राळे, सचिन शिंदे, सचिव सतीश चांभारे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रस्ताविक व स्वागत प्रकाश पाचारणे यांनी केले. जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ टाकळकर यांनी मार्गदर्शन केले. आभार सतीश चांभारे यांनी मानले.