सांगवी येथे Get In Shape Group व मा. प्रशांतदादा शितोळे यांच्या संयुक्त विद्यमाने गरबा-दांडिया प्रशिक्षण...

 


सांगवी : गणेश उत्सवानंतर आपल्याला वेध लागतात ते नवरात्राचे संस्कृत मध्ये नव म्हणजे नऊ रात्र साजरा होणारा उत्सव म्हणजे नवरात्र होय. नवरात्रीचा हा उत्सव संपूर्ण भारतात विविध प्रथा परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

हा उत्सव दुर्गुणांचा नाश करण्याकरिता असतो. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमधील जुनी सांगवी येथे श्री प्रशांत दादा शितोळे व Get In Shape यांच्या  संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय तानाजीराव शितोळे सरकार उद्यान म्हणजे शिवसृष्टी उद्यान येथे गरबा दांडिया प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. तसेच वर्षभर येथे  झुंबा व योगा Get In Shape या प्रशिक्षण दिले जाते. Get In Shape च्या प्रशिक्षिका  माधवी गायकवाड यांनी सांगितले कि,  या प्रशिक्षण वर्गामध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नवरात्रीच्या या काळामध्ये  गरबा दांडिया आणि भोंडला असे कार्यक्रम केले जातात. तसेच कोजागिरी पौर्णिमा देखील साजरी केली जाते.तसेच परिसरातील महिलांना या प्रशिक्षण शिबिरात सामील होण्याचे आवाहन देखील केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.