रंगावली आणि मानवी साखळीतून उलगडले हृदयाचे महत्व, नर्सिंगच्या विद्यार्थीनींचा पुढाकार

 

Jadhavar Institute

पुणे : मानवी शरीरातील हृदयाचे महत्व, ह्रदयाचे कार्य आणि त्यासंबंधी माहिती देत उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थीनींनी रंगावली आणि मानवी साखळीतून हृदयाचे महत्व उलगडले. जागतिक हृदय दिनानिमित्त हा आगळावेगळा उपक्रम न-हे येथील संस्थेच्या प्रांगणात राबविण्यात आला. 


जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य शितल निकम उपप्राचार्य अनुश्री पारधी, समन्वयक श्वेता कुंभार व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.


हृदय जाणून हृदय वापरा... या संकल्पने अंतर्गत रांगोळी व मानवी साखळी तयार करण्यात आली होती. याशिवाय विद्यार्थिनींनी पोस्टर स्पर्धा, हृदयाचे कार्यरत मॉडेल व पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये सहभागी होऊन हृदयाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमामध्ये इन्स्टिटयूटचे  उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.