"कसबा पोटनिवडणूक आणि पुणे लोकसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकांचा संदर्भ लावणे चुकीचा" मुरलीधर मोहोळ

Muralidhar-Mohal-said-that-it-is-wrong-to-refer-to-both-the-Pune-Lok-Sabha-&-kasaba-elections


पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. रवींद्र धंगेकर कसबा विधानसभेची निवडणूक जिंकून आमदार झाले. आता ते लोकसभेसाठी उभे आहेत. त्यामुळे ‘धंगेकर पॅटर्न’ लोकसभेसाठी चालणार का? याच्या चर्चा सुरू आहेत. याला मुरलीधर मोहोळ यांनी कसबा पोटनिवडणूक आणि पुणे लोकसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकांचा संदर्भ लावणे कसा चुकीचा आहे हे स्पष्ट करत, ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे हे अगदी सर्वसामान्य माणसाला कळतं”, असे म्हटले आहे.


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकसभा निवडणुकीचे महत्व, देशाचे नेतृत्व कसे असावे, महायुतीचा उमेदवार निवडून येणे हे का आवश्यक आहे, त्यांचा दृष्टिकोनातून पुण्याच्या विकासाचे पुढील 50-100 वर्षांचे विकासाचे व्हीजन, केंद्र सरकारच्या माध्यमातून पुणे शहरासाठी झालेली कामे, इत्यादी गोष्टींबाबत भूमिका स्पष्ट केली.


प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीने धाकधूक वाढली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना मोहोळ म्हणतात की, अगदी सर्व सामान्य माणसाला, ज्याला या विषयात थोडं कळतं तो सुद्धा सांगेल की एका विधानसभेची पोटनिवडणूक आणि लोकसभेची निवडणूक याचा एकमेकांशी संदर्भ लावण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ही निवडणूक देशाचे नेतृत्व कोणी केले पाहिजे?, देश कोणी चालवला पाहिजे?, कुठल्या नेतृत्वाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील?, कोणाच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होईल आणि देश पुढे जाईल? भारताला महासत्ताक देश म्हणून बनविण्याची क्षमता कोणामध्ये आहे? या सर्व गोष्टींचा विचार करूनच लोक मतदान करतात आणि करतील. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीसारख्या छोट्या निवडणुकीचे संदर्भ कुठे लागू होत नसतात.  लोकसभेची निवडणूक मोठी आहे आणि देशाचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे  मला या गोष्टीचं काही वाटत नाही.


मोदीजींना एक मत देण्याची संधी मला पुणेकर देतील याचा मला विश्वास

आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना मोहोळ म्हणतात, माझ्यासारखा एक वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्त्याला पक्षाने लोकसभेचा उमेदवार म्हणून संधी मिळणं हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच हे घडू शकतं.म्हणून मला माझ्या पक्षाचा नक्कीच अभिमान आहे. जिथे कार्यकर्त्याला न्याय दिला जातो, कार्यकर्त्याला संधी दिली जाते हे तुम्हाला आमचे सर्व नेते बघितले तर लक्षात येईल. अगदी देवेंद्रजींपासून मोदीजींपर्यंत.  माझ्यासारखा कुठलीही पार्श्वभूमी नसणारा आणि अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेला वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता म्हणून लोकसभेच्या मोठ्या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे राहताना नक्कीच समाधान आहे.  लोकांच्या अपेक्षा आहेत, पुणेकरांच्या अपेक्षा आहेत.  मला असं वाटतं की इथून मागे जे काही मी 25-30 वर्ष राजकीय सामाजिक जीवनात या शहरात काम केले मग ते संघटनात्मक असो किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मला विश्वास वाटतो की पुणेकर निश्चितपणे मला संसदेमध्ये पुण्याचा प्रतिनिधित्व करण्याची आणि मोदीजींना एक मत देण्याची संधी नक्की देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


पुणे शहराला सर्वोत्तम शहर करण्याचे माझे स्वप्न

लोकसभेत पुण्याचा चेहरा म्हणून गेल्यानंतर पुण्यासाठी कुठले विषय मांडाल याबाबत बोलताना मोहोळ म्हणतात, देशासाठी आणि समाजासाठी आपल्याला काम करायचे ही पक्षाची शिकवण आहे.  ब्रीद वाक्य सुद्धा तुम्ही बघा पहिलं प्राधान्य देश आहे, नंतर पक्ष आणि शेवटी मी हे आमचे ब्रीदवाक्य आहे आणि त्यामुळेच मला माझ्या शहरासाठी भविष्यात खूप काही गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यावरती कामही सुरू आहे. पुणे शहराला  जगातील सर्वोत्तम शहर करण्याचे स्वप्न आहे. आता पुणे शहर जगाच्या नकाशावर आहेच परंतु, अजून काही नागरी प्रश्न आहेत, काही सामाजिक प्रश्न असू शकतात या शहराला पुढच्या 50- 100 वर्षाच्या विकासाचे व्हीजन  डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणार आहोत.


आतापर्यंत जे काम केलं ते पुणेकरांच्या समोर आहे.  मोदीजींनी पुणे शहारासाठी केलेली कामे असे म्हटल्यास आपल्या डोळ्यासमोर सर्व कामांची यादी झटकन येते. त्यामध्ये कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात मेट्रो सुरु झाली.  पुणेकर मेट्रोने प्रवास करायला लागले.  पुण्याचे विमानतळ त्याचे एवढे मोठे विस्तारीकरण झालं.  नवीन टर्मिनल इतकं सुंदर तयार झालं.पुण्याला एक वैद्यकीय महाविद्यालय मोदीजी सरकारने दिलं,  चांदणी चौक सारखा एक हजार कोटीचा प्रकल्प आज पूर्ण झाला, प्रधानमंत्री आवास योजनेत हजारो घर आज पुण्यामध्ये उपलब्ध होत आहेत, नदी सुधारसारख्या  एका चांगल्या प्रकल्पाला 1000 कोटी अनुदान मोदींच्या सरकारने दिले अशी कितीतरी काम आहेत.  मला असं वाटतं की मोदीजींचं पुण्यासाठीचे योगदान,  देश समर्थपणे पेलू शकणार एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहणं आणि स्थानिक पातळीवर आम्ही पाच वर्षांमध्ये केलेली काम आहेत.  या सगळ्यांवरती आम्हाला विश्वास आहे की निश्चितपणे आम्हाला पुणेकर निवडून देतील.


पुणे या जगाच्या नकाशावरती स्वतःचं स्थान टिकवूंन आहे.  पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते पूर्णत्वाकडे नेणं, त्याच्यासाठीचा पाठपुरावा करणे, भूसंपादनाचा विषय असेल,  राज्य सरकारची असतील किंवा तांत्रिकदृष्ट्या केंद्र सरकारकडून काही यासाठी समन्वय साधून त्या पूर्ण करणे, शिवाय पुण्यामध्ये आज मेट्रो यशस्वी झाली आहे. वनाज ते रामवाडी असा पुण्याचा पश्चिम ते पूर्व भाग जोडणारा मेट्रोमार्ग कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे लोक खुश आहेत. त्यामुळे मेट्रोचा अधिक विस्तार करणे,मार्ग वाढवणे ही काही केंद्र सरकारशी निगडीत महत्त्वाचे विषय आणि स्थानिक पातळीचे प्रश्न याला माझे प्राधान्य असेल असे मोहोळ म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.