पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. त्यामुळे अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर जात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील किल्ले शिवनेरीवर जात महाराजांना अभिवादन केलं. यावेळी हे दोन्ही नेते समोरासमोर आले. यावेळी दोघांमध्ये काहीवेळासाठी बातचितही झाली. यावेळी अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना वाकून नमस्कार केला. आज शिवरायांची जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी मी शिवनेरीवर आलो आहे, असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची आणि स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. ही प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते. कोणत्याही मंदिरात जाण्याआधी पहिले नतमस्तक झालो. तो शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर… पहिला पायरीचे दर्शन घेतल्यानंतर संघर्षाची प्रेरणा स्वाभिमानाची प्रेरणा मिळते. लढण्यासाठी ताकद द्या. सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या. हेच आज शिवनेरीवर नतमस्तक होताना मागणं मागितलं, असं अमोल कोल्हे म्हणाले.
त्यांची एक जरी वारी आढळरावांनी दिल्लीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी झाली असती तर समाधान वाटलं असतं. आक्रोश मोर्चाची त्यांची टिंगल त्यांनी केली नसती तर बरं वाटलं असतं. धोरणात्मक टीका व्हायला हवी. वैयक्तिक टीका, व्यावसायिक कामाविषयी की टीका करणार नाही. पण धोरणात्मक टीका होणारच आहे. समोरासमोर बसून चर्चा करु पाच वर्षात मी काय केलं यावर बोलू… 2019 ची निवडणूक मी शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने केली आणि आताही तेच करतोय. माझ्या भूमिकेत कुठं बदल झालाय. शिरूरसह इतर मतदारसंघात ही मला लक्ष देता येतंय, असं अमोल कोल्हे म्हणा