पुणे: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुणे लोकसभेची निवडणुक चांगलीच चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी अद्यापही कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाहीय. वसंत मोरे यांनी याआधी कॉंग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेनेने संपर्क साधला आहे. मात्र मोरे यांना लोकसभा निवडणुक लढवायची असल्याने महाविकास आघाडीकडून ही जागा कॉंग्रेसला जाणार आहे. त्यामुळे मोरे यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळणे मुश्किल मानलं जात आहे.
पुणे लोकसभेसाठी भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मोहोळ यांनी आपल्या निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. मात्र तुम्ही तर अजून काहीच नाही ? असा प्रश्न विचारला असता. योग्य वेळी योग्य निर्णय आपण जाहीर करणार. मला महाविकास आघाडीकडूने उमेदवारी दिली नाही तरी मी निवडणूक लढणार आहे. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढलो तरी पहिल्या क्रमांकावर असणार आहे. यापुर्वी मुरलीधर मोहोळ महापौर होते आणि मी विरोधी पक्षनेता होता. ज्या ज्या वळई संघर्ष त्या त्या वेळी विजय मिळवला. असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ दरदिवशी विविध राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतांना दिसत आहेत. तर पुण्यात मोहोळांनी प्रत्यक्ष प्रचारालाही सुरूवात केली आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा अद्यापही उमेदवार ठरलेला नाही. यातच वसंत मोरे यांनी निवडणुक लढवली तर पुणे लोकसभेची निवडणुक ही तिरंगी होण्याची शक्यता आहे.