आता एकनाथ शिंदे म्हणतील तसं! विजय शिवतारेंची बारामती लोकसभेतून माघार


पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पती सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा असताना अजित पवारांनी उभ्या केलेल्या उमेदवाराला विरोध करण्याची भूमिका विजय शिवतारेंनी घेतली होती. अनेक आठवड्यांपासून काहीही झालं तरी अजित पवारांविरोधात लढणारच असं सांगणाऱ्या शिवतारेंनी अचानक माघार घेतली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुती अडचणीत येत असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यांचं सांगणं मला पटलं. तसेच माझ्या मतदारसंघातील स्थानिकांसाठी काही प्रकल्प मंजुर करण्यात आल्याने आपण बारामती मतदारसंघातून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे असं शिवतारे यांनी स्पष्ट केलं. पत्रकारांशी बोलताना अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालेल्या पुरंदरच्या तहाशी या तडजोडीची तुलना शिवतारेंनी केली.


शिवतारे पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हातून काही चुका झाल्या असतील, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आणि पुरंदर जनतेच्या विकासासाठी मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. जो निर्णय असेल तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत. माझे आयुष्य किती आहे हे मला माहित नाही. मी अनेक आजारांनी त्रस्त आहे. हे लक्षात घेता, जनतेचे हित मी जोपासायचे ठरवले आहे. निवडणूक न लढता आपल्या मागण्या मान्य होत आहेत. दीड लाखांचे लीड पुरंदर तालुक्यातील महायुतीला द्यायचे आहे, असे आमचे ठरले आहे.


5 लाख 80 हजार पवार विरोधी मतं कोणाला जाणार, यासाठी मी तिसरा पर्याय या मतदारांसमोर ठेवला आणि ही लोकसभा निवडणूक लढायचीच ही घोषणा केली होती. आता कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यांच्या तिखट प्रतिक्रिया ही उमटल्या. पण मी लढल्यावर काय होईल, यावर ही कारणमीमांसा झाली. पण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली. मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो, ते रागावले ही माझ्यावर. मला एक फोन आला, मुख्यमंत्री अडचणीत आहेत, त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावे लागेल. १५ ते २० लोकसभा उमेदवार पडू शकतात. असे मला सांगण्यात आले. यामुळे महायुतीला मोठा फटका बसणार होता. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान, रोहित पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघात भेटीगाठींचा धडाका लावला आहे. नव्या जुन्या जुन्या निष्ठावंतांच्या ते भेटीगाठी घेत आहेत.  आता शिवतारे किती जोर लावून सुनेत्रा पवारांचा प्रचार करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.