पुणे: शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाने पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीतून भास्कर भगरे यांना तर नगरमधून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आलं आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातून नितेश कराळे गुरुजी इच्छूक होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची सात वेळा भेटही घेतली होती. पण त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही.
मागील आठवड्यात कराळे गुरुजी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. वर्धा लोकसभा जागेसाठी कराळे गुरुजी इच्छुक होते. शरद पवार यांनी जर आदेश दिला तर ही निवडणूक लढवणार होते त्यासाठी कराळे गुरुजींनी शरद पवारांची ७ वेळा भेटही घेतली होती.
मी एकनिष्ठ राहणार असा शब्द दिला आहे. महाविकास आघाडीचं काम करतोय कोणत्याही आमदार खासदार यांच्याविरोधात बोलत नाही. वर्धा लोकसभेत 3 ते 3.5 लाख मत आहेत ती आपल्याला मिळू शकतात. विद्यमान खासदारांनी 10 वर्षात विकासकामं केली नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाहीत, असे नितेश कराळे म्हणाले होत.