आपल्या नेत्याप्रती किती विश्वास आणि श्रद्धा… मुरलीधर मोहोळ यांची मनसेच्या कार्यकर्त्यांवर स्तुती सुमने

Pune-Loksabha-Election-Murlidhar-Mohal-at-MNS-Melava

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला घेतलेल्या मेळाव्यात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे काल पुण्यात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर आता मनसेचे विविध नेते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत असल्याचं दिसत आहे. आज पुण्यात मनसे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर स्तुती सुमने उधळत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मेळाव्याच्या माध्यमातून संवाद साधला.

या वेळी बोलताना मोहळ म्हणाले की, आपल्या नेत्याप्रती किती विश्वास आणि श्रद्धा असावी? याचा वस्तुपाठ म्हणजे मनसेचा प्रत्येक घटक ! पार्टीच्या स्थापनेपासून तर आजतागायत संघर्ष करत मनसेचे नेते आणि कार्यकर्ते पार्टीसोबत राहिले. हे निश्चितच प्रेरणा देणारे आहे. यावेळी पंतप्रधान मा. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनानुसार सक्रिय राहून कार्यरत राहण्याचे आवाहन केले. तसेच मनसेच्या महायुतीतील समावेशामुळे विजयापासूनचा महाविजयापर्यंतचा टप्पा निश्चितच गाठता येईल. असा विश्वासही बोलून दाखवला. मेळाव्यास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मनसेचे नेते राजेंद्र (बाबू) वागसकर, सरचिटणीस . किशोरभाऊ शिंदे, सरचिटणीस बाळाभाऊ शेडगे, सरचिटणीस श्री. गणेशअप्पा सातपुते, सरचिटणीस अजयजी शिंदे, सरचिटणीस रणजितजी शिरोळे, शहराध्यक्ष साईनाथजी बाबर, मनसे महिला आघाडी अध्यक्षा वनिताताई वागस्कर, सचिव-प्रवक्ते योगेश खैरे, विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, विद्यार्थी सेनेचे सचिव श् आशिष साबळे, चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अमोल शिंदे, विनायक कोतकर, सुधीर धावडे, गणेश भोकरे, अजय कदम, सुनील कदम, विजय मते, अमोल शिरस, विक्रांत अमराळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.