बारामती: बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी अपेक्षित लढत असतांना शिवसेना शिंदे गटाचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी निवडणुकीच्या उडी घेण्याचा प्रयत्न केला. बारामतीत ५ लाख ८० हजार मतं हे पवारांच्या विरोधात असल्याचे सांगत शिवतारे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी महायुतीतील अजित पवारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. मात्र काही दिवसानंतरच विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवार यांना बहुमताने निवडून आणण्याची घोषणा केली. विजय शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे अनेकांची गोची झाली. यावरून आता एका कट्टर कार्यकर्त्याने विजय शिवतारे यांच्या भूमिकेवर प्रखड भाष्य करत जोरदार टिका केली आहे. यासंदर्भात एक पत्र देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विजय शिवतारे यांनी घेतलेल्या काही भूमिकांमुळे महायुतीत प्रचंड खळबळ उडाली. मात्र मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. अन् पत्रकार परिषद घेऊन बारामतीतून माघार घेतल्याची घोषणा केली. यामुळे शिवतारे समर्थक नाराज झालेत. याच संदर्भात एक पत्र व्हायरल होत आहे.
विजय शिवतारे तुमच्यासाठी मी इतरांशी आजपर्यंत भांडत आलो आहे. तुम्ही माझे नेते आहात. परंतु काल माझा नेता संधीसाधू, लेचापेचा, छक्के पंजे करणार आणि पोटात एक आणि ओठात एक असणारा निघाला, याचं वाईट वाटलं. बापू ज्या मिडीयानाे तुम्हाला डोक्यावर घेतलं. त्याच मीडियाने तुमची लया फार घालवून टाकली. सोशल मीडियात तर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटुराम, म्हणून हॅशटॅग फिरवला जात आहे. पुरंदरचा मांडवली सम्राट, पाकीट भेटलं का ?,घुमजाव, शिवतारे जमी पर, चिऊतारे, शेवटी, आपला आवाका दाखविला, ५० खोके शिवतारे ओके, अशा खोचक कमेंटचा सोशल मीडियावर मुसळधार पाऊस पडतो असल्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
यासह अजित पवाराला माझा आवाका कळेल ? म्हणणारे तुम्ही आवाका दाखविण्याच्या आधीच शेपूट घातलंत. मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होत असल्याचे खतगावकर यांनी सांगितले. असे बाळबोध समर्थन करणाऱ्या शिवतारेंना हे आधी समजलं नव्हतं का ? आता त्या ५० हजार ८० हजार पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं? हे तुम्ही सांगू शकाल का ? तुम्ही स्वत: हा घटनाक्रम घडवून आणला की, तुमचा बोलविता धनी दुसराच कुणी होता ? तुम्ही कोणाची स्क्रिप्ट वाटच होतात? आता तुमची वैयक्तिक भूमिका काय ? आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का ? तुम्ही म्हणजे फाडा पोस्टर निकला चुहा, नव्हेत का ? असा खोचक सवालही त्यांनी केलाय.
दरम्यान, या सर्व प्रश्नांची उत्तर सविस्तर देण्यासाठी एखादी पत्रकार परिषद घ्या. तसाही पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालण्याचा तुम्हाला जुनाच नाद आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.