‘माझ्या बायकोला ढिगानी मतं द्या, तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही,’ अजित पवार


दौंड : राज्याचा आणि देशाचा विकास झाला पाहिजे. तोच आम्हाला हवा आहे आणि याच मुद्द्यावर आम्ही महायुतीसोबत लोकसभा निवडणूक लढवत आहे. बारामतीसारखाच विकास दौंडमध्येसुद्धा केला जाईल. लागेल तेवढा निधी आमच्याकडे आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा व जलसंपदा खाते आहे. त्यासाठी अर्थ खात्यावरूनच सर्व निधी वर्ग केला जातो, हेसुद्धा लक्षात असूद्या. सर्वांच्या विकासासाठी बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बहुमताने विजयी करा. 'माझ्या बायकोला ढिगानी मतं द्या, तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही,' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. केडगाव चौफुला (ता. दौंड) येथे बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या कार्यकर्ता व पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते.


आमदार राहुल कुल म्हणाले की, लोकसभेला आम्ही कमी बोलू, काम मात्र जास्त करू. सुनेत्रा पवार यांना बहुमताने विजयी कैरू हे नक्की आहे. राजकारणातील आलेल्या वाईट अनुभवांचा पाढा वाचत असताना कुल यांना आपले अश्रू अनावर झाले. गट-तट बाजूला ठेवून सुनेत्रा वहिनी यांना मतदान करून त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावयाचे आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असे आवाहन या वेळी कुल यांनी केले.


वासुदेव काळे म्हणाले की, मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून मी एकनिष्ठ भारतीय जनता पार्टीमध्ये काम केले आहे. या वेळेस मी माझ्या आयुष्यात प्रथमच


राहुल कुल झाले भावनावश

स्व. सुभाष अण्णा कुल यांचा वारसा आम्ही चालवतो, असे म्हणताच आमदार राहुल कुल यांना आपले अश्रू अनावर झाले. त्यांना या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावरले. घड्याळाला मतदान करणार आहे, ते फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच, विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रित येत विरोध बाजूला ठेवून या वेळी सुनेत्रा पवार यांना बहुमताने विजय करावयाचे आहे, असे त्यांनी सांगितले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.