बारामती लोकसभेत निवडणूक आयोगाकडून सुप्रिया सुळे अन् अपक्ष उमेवारालाही तुतारी चिन्ह

Baramati Election Nivadyuk ayog Tutari Conflicts

पुणे :  लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी वाजणारा माणुस हे निवडणुक चिन्ह देण्यात आलं आहे. त्यावर सुप्रिया सुळे निवडणुक लढवत आहेत. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला देखील तुतारी हे चिन्ह देण्यात आल्याने शरद पवार गटाने आता केंद्रीय निवडणुक आयोगाकडे धाव घेतली आहे.


बारामतीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. अशातच लोकसभेच्या निवडणुक चिन्ह  वाटपात सोयल शहा युनूस शहा या अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं  आहे. त्यावरून शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाविरोधात शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे निवडणुक आयोग काय निर्णय घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीतील निवडणुकीसाठी एकूण ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची २० एप्रिलला पडताळणी झाली. त्यामध्ये पाच अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. तर ४६ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून ३८ उमेदवार रिंगणामध्ये राहिले आहेत. या ३८ उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले . 


दरम्यान, बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या शेख यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमामध्ये तुतारी या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने चिन्हांसंदर्भात घोळ होण्याची शक्यता आहे. त्यावरून शरद पवार गटाने आयोगात धाव घेतली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.