बारामती: बारामतीत होऊ घातलेल्या अटीतटीच्या लढतीत आता वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मागच्या आठवड्यात अजितदादांनी पवार आडनाव बघून मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर उत्तर म्हणून शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना बाहेरील व्यक्ती म्हणून संबोधिले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला असता त्या चांगल्याच भावुक झालेल्या दिसून आल्या. तो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यातच आता शरद पवारांनीच माझी सुन म्हणून निवड केली असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितलंय.
शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, घरातील सगळी मोठी माणसंच सुनेची निवड करतात. तशी माझी निवड ही शरद पवारांनीच केली होती. असं म्हणत बारामतीत अटीतटीची लढत वगैरे काही नाही. नातं नात्याच्या जागेवर आहे. राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे. ही विचारांची लढाई आहे नात्याची नाही. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. त्याचबरोबर बारामती तालुक्यातील सगळ्याच भागात फिरले. सगळ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माझं स्वागत होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, इतका मोठा लोकांचा चांगला प्रतिसाद पाहून मला सकारात्मक वाटत आहे. मला उमेदवारी मिळाली ही बारामतीकरांची इच्छा होती. जनता हेच माझं कुटुंब आहे. जनता माझ्या पाठीशी उभी आहे. त्यामुळेच मी लढतेय. असेही त्या म्हणाल्या. आजपर्यंत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार केला. आता स्वतः साठी प्रचार करित आहात त्या प्रश्नावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “ज्यावेळी स्वतः साठी प्रचार करावा लागतो. त्यावेळी जबाबदारीची भावना असते. प्रत्येक मतदाराकडे जाऊन आपल्याला मतदान करावे असे आवाहन करून, त्यांच्यामध्ये एक प्रकारे विश्वास निर्माण करण्याचे काम केले जाते.