बारामती लोकसभेचीजागा मिळविण्यासाठी अजित पवारांनी सभांचा धडाका सुरू केला आहे. मेळावे, सभांमधून ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. इंदापुरात त्यांनी डॉक्टर, व्यापाऱ्यांशी संवाद साधला. "तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, मात्र तुम्ही त्या प्रमाणात ईव्हीएमचे बटन पण दाबा. बटन दाबताना हात आखडता घेतला तर निधी देतानाही आम्हाला हात आखडता घ्यावा लागेल," असे अजित पवारांनी इंदापूरच्या सभेत व्यापाऱ्यांना सांगितले.
देशामध्ये विकास करण्यासाठी पैसा लागतो. महाराष्ट्रातल्या टॅक्स माझ्या हातात आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो, तुम्ही पण पाळा. केंद्राचे बजेट झाल्याशिवाय राज्याचे बजेट करता येत नाही. यातून व्यापाऱ्यांना आणि सर्वांनाच फायदा होईल, मात्र फायदा कोणामुळे झाला हे विसरू नका. मला आदेश द्यायला आवडतो, मी अधिकाऱ्यांनाही आदेश देतो, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनाही आदेश देतो. आता मात्र हा कार्यकर्ता आहे याला सांभाळा, असे सांगावे लागते, असे ते मिश्लिकपणे म्हणाले