ष्टीकरणानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
“४ दिवस सासूचे संपले, आता सुनेचे ४ दिवस येऊ द्या. ४० वर्ष झाली तरी बाहेरचे म्हणत आहेत”, असा सणसणीत टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावला आहे. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारांन प्रत्युत्तर दिलं आहे.
“मी एक वेगळी भूमिका घेतली. मी एकटा नाही तर प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि ८० टक्के पेक्षा जास्त आमदारांनी ही भूमिका स्वीकारली. याचे कारण आपले प्रश्न सुटावे. गेल्या १२ वर्षात केंद्र सरकारचा बारामती मतदारसंघात निधी आलेला नाही”, असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.
“ही वडीलधारी जरा, जुना काळ आठवत असेल, तर त्यांना म्हणा, जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा. आता नवीन काळ बघा. आता सासूचे चार दिवस संपले, आता सूनेचे चार दिवस येऊद्या, असं सांगाना. की फक्त सासू-सासू-सासू, मग सुनेनं फक्त बघत बसायचं? बाहेरची-बाहेरची-बाहेरची, असं कुठं असतं का राव? असतं का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. ४० वर्षे झाली तरी बाहेरची? किती वर्ष झाले मग घरची? सांगा आई बहिणीनों, बघा बाबा आता” असं अजित पवार म्हणाले आहेत.