पुणे: काही दिवसांपूर्वीच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, चेअरमन, माजी खासदार, ज्येष्ठ नेते नानासाहेब नवले यांची पुणे येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी आशीर्वाद, पाठिंबा दिला होता. बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या रविवारी मुळशी तालुक्यातील प्रचार दौऱ्यात होत्या. या दौऱ्यात ताथवडे येथेही त्यांनी भेट दिली. सुनेत्रा पवार येणार असल्यानं संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी खासदार विदुरा तथा नानासाहेब नवले हेही त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी आले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी घरात पाऊल टाकताच नानासाहेब नवले म्हणाले 'यु आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉ'.उपस्थित सर्वांनीच आनंद व्यक्त केला. तर, सुनेत्रा पवार यांनी मात्र नानासाहेब नवले यांना नमस्कार करून कौतुकाचा विनम्रपणे स्वीकार केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांना परके ठरवले होते. या वक्तव्यावर टीका झाल्याने पवारांना कधी नव्हे तो खुलासा करून 'आपण तसे बोललो नाही, आपला उद्देश तसा नव्हता. आपल्या म्हणण्याचा गैर अर्थ काढला,' असे सांगून स्वतःच्या कृत्याचे खापर माध्यमांवर फोडले होते. तसेच, शरद पवारांनी नानासाहेब नवलेंच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्याच नानासाहेब नवलेंनी सुनेत्रा पवारांना, 'तू सर्वात बेस्ट सून आहेस,' असे प्रशस्तीपत्रक दिले. एवढेच नाही तर खूप आग्रह करून दोन घास तरी खाल्लेच पाहिजेत, असे सांगून जेवण करायला लावले.
“हिंजवडी आय टी पार्कच्या ठिकाणी साखर कारखाना सुरू होणार होता. त्यावेळी सहकाराच्या पदाधिकाऱ्यांनी पायाभरणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना बोलावले होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब नवले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार भाषण संपेपर्यंत, पायाभरणी करूनही कारखाना येथे सुरू होणार नाही, असे सांगितले होते त्या वेळी सोसायटीतील सदस्य संतप्त झाले होते” त्या वेळी शरद पवारांनी पुढाऱ्यांना पटवून दिले की सरकारने आयटी पार्क उभारण्याची योजना आखली आहे आणि त्यासाठी हिंजवडी ही सर्वात योग्य जमीन आहे. मावळातील शेतकऱ्यांना कारखान्यासाठी इतरत्र नुकसानभरपाईची जमीन मिळाली आणि तो यशस्वीपणे चालवला गेला. “आज, हैदराबाद आणि बेंगळुरूसह भारतातील आयटी उद्योगासाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरांपैकी पुणे हे शहर आहे. हिंजवडीत लाखो तरुण उपजीविका करत आहेत.
दरम्यान, नानासाहेब नवलेंच्या नातसून जान्हवी सुमेश नवले परवाच UPSC मध्ये यशस्वी झाल्या. त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी जान्हवी यांचे कौतुक करत नवले कुटुंबीयांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी जान्हवी नवले यांना शुभेच्छा दिल्या.