बारामती: लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारासंघातील प्रचार दिवसेंदिवस अधिक जोर पकडत आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. सुनेत्रा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या मतदार संघात नणंद विरूद्ध भावजयी अशी लढत पहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी अजितदादांनी अधिक जोर लावला असून सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार रणनिती आखत आहेत.
महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवारी लढवत आहेत. दोन्ही उमेदवारांच्या कुटुंबीयांकडून आपापल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ त्यांची कन्या रेवती सुळे यांनीही प्रचारात सहभाग घेतला असून, योगेंद्र पवार यांच्या समवेत त्यांनी आज बारामती शहरातून पदयात्रा काढली.
आईच्या प्रचारासाठी आला रेवती सुळे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतेय. रेवती सुळेंकडून बारामतीत सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू आहे. अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार आणि आणि रेवती सुळे बारामतीत झालेल्या पदयात्रेत सहभागी झाली होते. यंदाच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील लेकी- सुनांच्या उमेदवारीची चर्चा असताना सुप्रिया यांना पवार कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळताना दिसतोय