सुनेत्रा पवारांना दौंड तालुक्यातून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा रमेश आप्पा थोरात यांचा निर्धार

 

सुनेत्रा पवारांना दौंड तालुक्यातून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा रमेश आप्पा थोरात यांचा निर्धार

दौंड: महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दौंड तालुक्याचा दौरा केला. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रथमच त्यांनी दौंड तालुक्यात संयुक्त दौरा केला. या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्वच प्रमुख नेते एकवटल्याचे चित्र दिसून आले. आम्ही प्रमुखच आता एकत्रपणाने या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे दौंड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल, असा विश्वास माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केला. तर महायुतीत आम्ही सर्वांनी एकत्रित पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरही कार्यकत्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सुनेत्रा पवार यांना अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन राहूल कुल यांनी मतदारांना केले.


देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. विकासाला महत्त्व देणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होत असताना आपणही त्यात मतदान करून सामील व्हावे आणि  विकासरथात हातभार लावावा, असे आवाहन  सुनेत्रा पवार यांनी यावेळी मतदारांना केले.


दरम्यान, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार दौंड तालुका दौऱ्यावर असताना हातवळण गावात गेल्या असता तेथील स्थानिक महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील असा विश्वास दिला. तसेच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वैशाली नागवडे, उत्तमराव आटोळे, नंदू पवार, वीरधवल जगदाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.