पुणे: लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचार जोरदार सुरू आहे. वैयक्तिक गाठीभेटी आणि पदयात्रेवर उमेदवार जास्त भर देताना दिसत आहेत. काल माहायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील खंडकवासला विधानसभा मतदारसंघात सोसायटयांमध्ये भेट देत प्रचार केला. यावेळी उपस्थित जनसमुदयाच्या पाठिंब्यामुळे सुनेत्रा पवार भारावून गेल्याचे दिसून आले.
यावेळी भावना व्यक्त करताना सूनेत्रा पवार म्हणाल्या, प्रचंड संख्येने सोबत चालणारा जनसमुदाय, ठिकठिकाणी होणारे अभूतपूर्वक स्वागत, यासोबतच अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पाठिंब्यासाठी उंचावलेले हात, "सोबत आहोत" असा विश्वास देत "घड्याळा"ला मतदान करण्याची ग्वाही आणि महायुतीला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करीत होत असलेल्या प्रेमाचा वर्षाव हा मला भारावून टाकणारा आहे. आज मी येथील स्थानिकांचे प्रश्न समजून घेतले. सोसायटीमध्ये भेट दिल्यावर प्रत्येक ठिकाणी आपुलकीने स्वागत झाले. महायुतीच्या विजयासाठी जनता उत्सुक आहे, ठाम आहे हे दिसून आले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी काल बिबवेवाडीसह कात्रज परिसरातील हस्तीपुरम, मनमोहन, ग्रीन एकर, किमया, पूजा गार्डन, टीसीजी कोरोला, पूजा पार्क, ओम अभिषेक, ओम अलंकार, कोणार्क अंगण, तोडकर रेसिडेन्सी, पुनम गार्डन, स्टेट बँक नगर, पार्क लँडमार्क, कपिल उपवन, पर्पल कॅसल, द लिजेंड, महालक्ष्मी नगर, चिंतामणी रेसिडेन्सी, ऑडी आर्केड, लेक टाऊन, पद्मजा पार्क, नॅन्सी लेक होम आदी सोसायटयांमध्ये नागरिकांशी भेटून संवाद साधला.
यावेळी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्ता धनकवडे, अप्पा रेणुसे, विजया भोसले, राणी भोसले, प्रकाश कदम, रूपाली धाडवे, सुशांत ढमढेरे, श्वेता कामठे, राकेश कदम, विराज घुले, संतोष नांगरे, रामदास गाडे, अर्चना ढमढेरे, अंकुश कोकाटे, मुकुंद काकडे, विकास लवटे, ओंकार खाटपे, रवींद्र खळदकर, राजेंद्र राऊत, मीनाताई देशपांडे, शेखर शिंदे, बाळासाहेब पवार, श्रीराम दवणे, दिलीप घाटगे, निलेश पतंगे, रमेश वाईकर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.