सासवड: पुणे जिल्ह्यातील सासवड येथील पालखीतळावर महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. या सभेला महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांनी सभेत संबोधित करताना अजित पवारांवर जोरदार तोफ डागली. त्या म्हणाल्या की, मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली असून गँग कमी झाली आहे. आपलं चिन्ह गेला नसून पळवून नेलं असल्याची टीका केली.
सहा महिन्यापूर्वी आमचा घटस्फोट झालाय आणि अचानक काय झालंय. काय समजत नाही. अचानक माझ्यात काय बदल झालाय? त्यांचं भाषण कोण लिहून देतंय काय माहिती? ठिक आहे निवडणूक आहे. त्यामुळं टीका होत राहते. पण मी मेरिटवर मतं मागते. पत्रकार मला रोज प्रश्न विचारतात, मी त्यांना आता एकच उत्तर देते. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी…, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
सभेला उपस्थित राहिल्याबद्दल संजय राऊत यांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. व्यासपिठाच्या खाली कोण कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे ओळखू शकत नाही. इतके सगळे एक होऊन कामं करतायेत. तीन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला पाठवलं. आता माझं कामं बघून पुन्हा एकदा मला निवडून द्यावं, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.
यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, आमदार अशोक पवार, आमदार संजय जगताप, संभाजी झेंडे, माणिक झेंडे पाटील, प्रदीप पोमण, अभिजीत जगताप, दत्ता कड, श्याम माने, गौरी कुंजीर, भारती शेवाळे, सुदाम इंगळे, बंडूकाका जगताप, शंकर हरपळे, विजयराव कोलते, विकास लवांडे, पुष्कराज जाधव, राहुल गिरमे, शिवाजी कोलते, अंकुश काकडे, बाळासाहेब भिंताडे, लक्ष्मण माने, अमोल कामथे, उपस्थित होते.