"घरात 40 वर्ष राहणाऱ्या सुनेची किंमत कळाली नाही, तो जनतेशी काय बांधील राहणार" विखेंची वादात उडी

 

Baramati-Loksabha-Sharad-Pawar-and-Radhakrush-Vikhe

बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवारांच्या कन्ये विरोधात सुनाबाई उभ्या आहेत. त्या 40 वर्ष पवारांच्या घरात राहतायेत पण पवारांना त्यांची किंमत नाही, मग जनतेची किंमत त्यांना कशी राहणार आहे. जनतेला त्यांनी कधीच वाऱ्यावर सोडलं आहे, अशा शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.


काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील विरोधी उमेदवार व त्यांच्या सूनबाई सुनेत्रा अजित पवार यांच्यावर ‘घरातले पवार आणि बाहेरचे पवार यात फरक असतो’, अशी टीका केली होती. त्यांच्या टीकेचा आज भाजप नेते राधा कृष्ण विखे – पाटील यांनी भर सभेत समाचार घेत शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.


राधाकृष्ण विखे – पाटील म्हणाले, ज्या माणसाला आपल्या घरात 40 वर्ष राहणाऱ्या सुनेची किंमत कळाली नाही, तो जनतेशी काय बांधील राहणार. पवारांनी आयुष्यभर केवळ फोडाफोडीचे राजकारण केले. माणसांवर माणसं घातली. वैयक्तिक द्वेषाच राजकारण ते करतात. द्वेष, मत्सर या शिवाय दुसरं राजकारण त्यांनी कधीच केलं नाही. त्यामुळे जनतेचा शाप तुम्हाला या लोकसभा निवडणुकीत मिळाल्या शिवाय राहणार नाही. उरली सुरली राष्ट्रवादी, उरली सुरली शिवसेना (उबाठा) यांना  निवडणुकीनंतर जनता घराबाहेर बाड बिस्तार काढून दिल्या शिवाय राहणार नाही. असा विश्वास भाजप नेते राधा कृष्ण विखे – पाटील यांनी व्यक्त केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.