पुणे: उच्च शिक्षण घेण्यासाठी आजकाल सर्वात प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश कसा मिळेल? यासाठी विद्यार्थी प्रयत्न करताना दिसतात. काही विद्यार्थ्यांचं तर शिक्षणासाठी परदेशात जाण्याचंही स्वप्न असतं. १२ वी बोर्डाच्या परीक्षा मागील महिन्यात संपल्या असून पदवी परीक्षा देखील संपत आल्या आहेत. या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र कोठे योग्य संधी उपलब्ध आहेत? एज्युकेशन लोन कसे मिळू शकते का? परदेशी जाण्यासाठी कोणत्या स्कॉलरशिप असतात? हे सगळे प्रश्न विद्यार्थ्या सोबत त्यांच्या पालकांना देखील पडतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'स्टडी स्मार्ट'च्या वतीने 'ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२४ 'चे काल दिनांक १३ एप्रिल रोजी दि पोच हॉल, बोट क्लब, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.
या ठिकाणी इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई येथील जवळपास ४० हून अधिक सर्वोत्तम विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी चर्चा करता असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी येथे मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांना याठिकाणी निशुल्क मार्गदशन मिळाले. या फेयरचे हे १४ वे वर्ष होते.
या वेळी ‘स्टडी स्मार्ट’ चे संचालक चेतन जैन यांनी संस्थेच्या नवीन वेबसाइट आणि लोगोचे अनावरण केले, जे विद्यार्थी कल्याणासाठी त्यांच्या वचनबद्धतेच्या नव्या अध्यायाचे प्रतीक आहे. प्रतिष्ठित मान्यवरांनी या प्रसंगी उपस्थित राहून शैक्षणिक उपक्रमांच्या क्षेत्रात या मेळ्याच्या महत्त्वाला आणखी विश्वास दिला.