छत्रपती शाहू महाराजांना एकाच वेळी १७ माजी महापौर अन् २२० माजी नगरसेवकांचा पाठिंबा

 

Kolhapur-Loksabha-Election-Chhatrapati-Shahu-Maharaj

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. कोल्हापूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदार संघ दूध प्रकल्प, ऊस शेती, ऊस कारखान्यांसाठी ओळखला जातो. या जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. कोल्हापूरला स्वत:ची ऐतिहासिक ओळख आहे


कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती रिंगणात आहेत. तर महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक आखाड्यात आहेत. ही लढत चुरशीची होणार असून आता शाहू महाराजांना २२० माजी नगरसेवक आणि १७ माजी महापौरांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.


सर्व माजी नगरसेवक व महापौरांनी न्यू पॅलेस येथे झालेल्या मेळाव्यास उपस्थित राहून शाहू महाराजांचा प्रचार करण्याचा निर्धार केला. या मेळाव्याला काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील आदी नेते उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.