आंबेडकर जयंतीच्या निम्मिताने पिंपळे गुरव येथे पुर्णपणे मोफत डायलिसीस शिबीर घेऊन मानवंदना

 

On-the-occasion-of-Ambedkar-Jayanti-Mananandana-with-completely-free-dialysis-camp-at-Pimple-Gurav

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त  बुद्धराष्ट्र तरुण मित्र मंडळाने वेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे. बुद्धराष्ट्र तरुण मित्र मंडळ राजीव गांधी नगर यांच्या वतीने व भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन पिंपळे गुरव येथे "ऒंकार मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, पिंपळे गुरव यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच नागरीकांना पुर्णपणे मोफत डायलिसीस उपक्रम राबविण्यात आला. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकऱ्यांना पुर्णपणे मोफत सेवा देण्यात आली. 


खासगी रुग्णालयामध्ये डायलिसिसचा खर्च अडीच हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत आहे. मूत्रपिंडाच्या आजाराच्या त्रासामुळे आठवड्यातून दोनदा रुग्णांना डायलिसिस घ्यावा लागतो. त्यामुळे गरीब रूग्णांसाठी हे महाग आहे. यामुळे बुद्धराष्ट्र तरुण मित्र मंडळ आणि ऒंकार मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमानाने  मोफत डायलिसिस शिबीर घेऊन सांगावी अन् पिंपळे गुरव परिसरातील रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल आहे.


या वेळेस, हॉस्पीटलचे सर्वेसर्वा श्री. विजय खर्चे डॉ.देवयानी लोंढे, डॉ अमोल शेंडे, सोमनाथ बोडरे, व हॉस्पीटल स्टाफ तसेच मंडळातील कार्यकर्ते श्री. राघू साबळे - संजय गायकवाड, अनंत सरवदे, तानाजी पायाळ, सतिश कोल्हे, देवानंद ओव्हाळ, शुध्दोधन डोंगरदिवे, आकाश हावळे इत्यादी कार्यकर्ते व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रविण मोतीराम कांबळे यांनी केले तसेच कार्यक्रमाला विशेष सहकार्य भाजपा सांगवी रहाटणी मंडल उपाध्यक्ष ललित म्हसेकर यांनी केले.व भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ललित म्हसेकर यांनी सर्व नागरीकांना संविधाना विषयी महत्त्व समजून सांगीतले


दरम्यान, समोर आलेल्या एका आकडेवारीनुसार, देशात प्रत्येकवर्षी 2.2 लाख नवीन रुग्ण समोर येत आहेत. रूग्णांची ही वाढती संख्या लक्षात घेता दरवर्षी 4.4 कोटी डायलिसिस आवश्यक असतात. म्हणूनच देशात अनेक हजार डायलिसिस सेंटर सध्या सुरू आहेत. पण तरीदेखील मागणीनुसार पुरवठा होत नाही. या रुग्णांना दर आठवड्याला डायलिसिस करावं लागतं. यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे लाखो रुपये यामध्ये खर्च होतात. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.