शिवसेनेच्या सीमा कल्याणकर यांनी केले सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचे नियोजन

 


इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आता शिवसेनेची महिला आघाडी मैदानात उतरली आहे. यावेळी बोला 'रामकृष्ण हरी, ताई पेक्षा आमची वाहिनीच भारी' अशा घोषणा शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला पदाधीकाऱ्यांनी दिल्या. 


बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारास आज इंदापूरमधून सुरूवात करण्यात आली. त्यापूर्वी शिवसेनेच्या पुणे जिल्हा पदाधीकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये शिवसेना नेत्या डॉ. नीलम ताई गोऱ्हे, शिवसेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष सीमा कल्याणकर, गीतांजली ढोणे, मंगेश चिवटे, राम भाई राऊत तसेच शिवसेना वैद्यकीय कक्षाचे व्यवस्थापक वा पदाधिकारी उपस्थित होते.       


त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष सीमा कल्याणकर म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही आज आठवडे बाजारा पासून सुरूवात केली आहे. आठवडे बाजारामध्ये पत्रक वाटून महिलांनी सुनेत्रा पवार यांना अधिक मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. 


पुढे बोलताना सीमा कल्याणकर म्हणाल्या, आपण कुठल्याही गावात गेलो तर आपल्या घरातली जेष्ठ मंडळी, वडीलधारी माणसं ही 'राम कृष्ण हरी' म्हणतातच. मात्र विरोधकांनी त्याच्यासोबत आणखीन एक वाक्य जोडून स्वतःची घोषणा तयार केली आहे. त्याच्यापुढे जाऊन आम्ही आता म्हणणार आहे 'राम कृष्ण हरी ताई पेक्षा आपली वहिनीच भारी' आणि आता आपल्या वहिनी लवकरच दिल्लीमध्ये जातील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.