धायरी येथे रखरखत्या उन्हात सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद


 बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधीकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आपल्या विरोधी उमेदवार, महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या प्रचारात अत्यंत सुसूत्रता दिसून येत आहे. रोज गावभेटी देणे, नागरिकामध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचे काम सुनेत्रा पवार करत आहेत. अशातच आज त्या धायरी दौऱ्यावर असून धायारीतील नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. 




सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून पुण्यातील उष्णतेचा पारा ४० अंशापर्यंत पोहोचला आहे. मात्र रखरखत्या उन्हातही सुनेत्रा पवार यांना पाठींबा देण्यासाठी धायरीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. ढोल-ताशांच्या गजरात सुनेत्रा पवार यांचे धायरीत स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी धायरीतील रहिवासी मोठ्या संख्येने जमले होते. सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा असल्याचा विश्वास मतदारांनी यावेळी व्यक्त केला. या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.