अखेर विखे पिता-पुत्र आणि राम शिंदे यांच्यामध्ये दिलजमाई! नगर दक्षिणच्या सुभेदारीची वाट सोयीस्कर

Vikhe-father-son-and-Ram-Shinde-and-leaders-reconciled-Waiting-for-victory-is-easy

अहमदनगर: जामखेड तालुका भाजप पदाधिकऱ्याची प्रचार नियोजन बैठक खा.सुजय विखे आणि आ.राम शिंदे यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी पार पडली. लोकसभा निवडणुकीला राम शिंदे हे इच्छुक होते. त्यानंतर त्यांचा वाद हा देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला होता. त्यानंतर आज जामखेड तालुक्यातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाने 13 मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत, केंद्रीय नेतृत्वाने अब की बार चारसौ पारचा नारा दिला आहे. त्यामुळे सुजय विखे यांना विजयी करणे हे सर्वांचे लक्ष आहे. नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीतजास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

वैयक्तीक मतभेद असले तरी ते निवडणुकीत काढायचे नसतात. उलट पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडायची असते. फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत खासदार डॉ. विखे यांच्याशी गळाभेट झाली नसली तरी हस्तांदोलन झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.


'डॅमेज कंट्रोल'साठी विखे पिता-पुत्रांची राजकीय यशस्वी खेळी, 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पूर्वनियोजन मेळाव्यात खासदार डॉ. सुजय विखेंनी माफीनामा सादर केला. त्यानंतर त्यांचे वडील पालकमंत्री राधाकृष्ण विखे  यांनी भाजप नेते आमदार प्रा. राम शिंदे यांची सोमवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विखे पिता-पुत्रांची ही खेळी राजकीय 'डॅमेज कंट्रोल'साठी यशस्वी होताना दिसत आहे, हे येणारा काळच सांगेल. मात्र, मंत्री विखेंनी आमदार शिंदे यांच्याशी बंद दाराआड तब्बल दीड तास चर्चा करून भाजप आणि इतर पक्षातील विखे विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात यशस्वी ठरले. या दोघा नेत्यांमधील चर्चेचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. 


खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार प्रा. राम शिंदे यांच्यातील नाराजी अखेर दूर झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती केल्याने दोघांमधील वाद मिटला आहे. त्यामुळे खासदार डॉ. विखे यांना दिलासा मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.