पंतप्रधान, गृहमंत्र्यावर टीका करून संसदरत्न पुरस्कार मिळविले; अजित पवार यांचीं सुप्रिया सुळे यांच्यावर टीका…

Baramati Lok Sabha Election Ajit Pawar Criticized on Supriya Sule

 भोर : राज्यात मंगळवारी लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील मतदान पार पडणार आहे.  या टप्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार रविवारी संपला. ‘नुसता सेल्फी काढून किंवा व्हॉट्सअॅपवर मेसेज करून प्रश्न सुटत नाहीत. काही जणांनी फक्त पंतप्रधान, गृहमंत्र्यावर टीका करून संसदरत्न पुरस्कार मिळविले. त्यासाठी विकास करावा लागतो,’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘पुण्याजवळ असूनही भोर तालुक्याचा हवा तसा विकास झाला नाही. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. आश्वासनांवर विश्वास ठेऊ नका. एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. मी तालुक्याचा विकास करून दाखवीन,’  दुआया निवडणूक संपल्यानंतर  येथील आमदार, खासदारांचे तोंड निवडणुकीनंतर दोन दिशेला दिसतील,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले,  ‘विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल असे सर्व नेते आम्ही महायुतीच्या माध्यमातून विकासासाठी एकत्र आलो आहोत,’ ‘मला सवाँनी साथ द्या. बारामती, पिंपरी- चिंचवडप्रमाणे इंदापूरचा विकास करू,’ असे आवाहन त्यांनी केले. 

‘इंदापूरच्या शेतीच्या आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहावे. यांनी, महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने कील विजय करावे,’ असेही आवाहन अजित पवार यांनी केले.

आमदार रोहित पवार हे अजित पवारांवर सातत्याने टीका करीत आहेत. त्याचा संदर्भ देत ‘जे वटवट करतात त्यांना आम्हीच संधी दिली. आम्हीच त्यांचा प्रचार केला. काही जण, तर पहिल्या टर्मलाच वटवट करायला लागले आहेत. ज्यांना साहेबांचा विरोध होता अशांनी माझ्या नादी लागू नये,’ अशा शब्दांत रोहित पवार यांना आजितदादांनी खडसावले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.