बारामती: गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या बारामती मतदारसंघात आज प्रचाराच्या तोफा थंडवणार आहे. यातच आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदारसंघात सांगता सभा होत आहेत. अशातच पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली.
पाणीप्रश्नावरून सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, कोण मायचा लाल दौंड, बारामती, इंदापुरचं पाणी आडवतो ते मी पाहतो. असं काल कोणी तरी बोललं. अंग पण तिथं पाणीच नाही, तर काय पाहते ? अरे यांना काही माहिती नाही. आम्ही सगळं कामं करायचो. या राहुल कुल यांना विचारा, किती टीएमसीची धरणं आहेत, किती पाणी पुण्याला प्यायला जातं, किती पाणी शिल्लक राहतं ? पाणीच शिल्लक नाही तर कोण अडवणार ? अगं बाई आम्ही तुला निवडून द्यायचो, उगीच मला बोलायला लावू नका. असा इशाराही अजित पवारांनी दिला.
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, मी तर ठरवलं आहे या भावकीवर बोलायचंंच नाही. त्यांचं त्यांना लखलाभ. असं काही बोललं तर थोडा वेळ लोकांना बरं वाटेल, पण त्यातून लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत. तुमच्या शेतामध्ये पाणी आणण्यासाठई राज्याचा पैसा आणला पाहिजे. केंद्राचा पैसा आणला पाहिजे. बुडीत बंधारे बांधले पाहिजेत. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे. असेही अजित पवारांनी म्हटलं.