पुण्यात कमळाचे बटन दाबलं की मुरलीधर मोहोळ यांना मत मिळेल

Pune Loksabha Election Devendra Fadanavis In Pune

पुणे : काहीही झाले तरी भाजपला चारशे जागा मिळणारच आहेत. मग आपण मतदान केले, तर काय फरक पडतो, मी नाही गेलो तरी चालेल, अशा भ्रमात कुणीही राहू नका. मतदानाच्या दिवशी घरी बसून नंतर राजकारण्यांना नावे ठेवण्याचा नैतिक अधिकार आपल्याला राहत नाही. यामुळे येत्या सोमवारी मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने नरेंद्र मोदींना मत द्या. असे जाहीर आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 


पुढे बोलतांना ते म्हणाले की,  आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जागतिक नेते झाले असून त्यांच्यामुळे भारत एक मजबुत देश झाला आहे. आपल्या देशात अगोदर बॉम्बस्फोट व्हायचे आणि केवळ अमेरिकेत जाऊन त्याचे पुरावे द्याचे. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे बॉम्बस्फोट होताच आपण सर्जिकल स्टाईक केला. जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनवून त्यातून संधी, रोजगार, गरीब कल्याण यांच्यामाध्यमातून देश मजबुत स्थितीत आलाय. त्यामुळे लोकशाहीत मतदानाचा पवित्र अधिकार असून जो मतदान करतो त्यालाच बोलण्याचा नैतिक अधिकार असतो. त्यामुळे तुमच्या मतदानातून कर्तबगार सरकार तयार होते. पुण्यात कमळाचे बटन दाबलं की मुरलीधर मोहोळ यांना मत मिळेल. त्यातून तुमचे आशीर्वाद मोदींना मिळतील. त्यातून मोदीजी मजबूत भारत बनवतील. असा आशावाद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


२०१४ पासून बदललेले पुणे आपल्याला बघायला मिळाले. अजित पवार बरोबर आल्याने विकास आणखी गतीने होणार असून एअरपोर्ट, रिंगरोड यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. पुणे हे मॅन्युफॅकचरिंग आयटी हब आहे. देशातील सर्वोत्त शहर बनवण्याची ताकद पुण्यात आहे. आपण केवळ एक खासदार निवडून देत नाही तर पुण्याकरता काम करणाऱ्या मोदींसाठी खासदार निवडून देत आहोत. त्यांच्या माध्यमातून काम करायचे आहे. असं म्हणत बापट साहेबांनी चांगले काम केले आहे. त्यांचे काम पुढे न्यायाचे आहे. असेही ते म्हणाले. 


दरम्यान, पुणे लोकसभेसाठी येत्या १३ मे रोजी मतदानर होणार आहे. त्याआधी महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार होतांना दिसत आहे. आज अजित पवारांच्या देखील मोहोळांसाठी सभा होत आहे. तर दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे रोड शो करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर धंगेकरांसाठी शरद पवारांचीही सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.