‘घर चलो’ अभियानातून भाजपा कार्यकर्ते दहा लाख घरात पोहोचणार!

Pune-Loksabha-Election-Murlidhar-Mohol-and-Ravindra-Dhangekar


पुणे- पुणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे आणि वंचित विकास आघाडीचे अनिस सुंडके यांच्यामध्ये लढत होणार आहे. चारही उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आला आहे. पदयात्रा, मेळावे, वैयक्तिक, गाठीभेटी या माध्यमातून चारही उमेदवारांचा प्रचार सुरू असतानाच आता महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिककयाने निवडून आणण्यासाठी भाजपचे केडर अॅक्टिव्ह झाले आहे. भाजपकडून पुन्हा एकदा ‘घर चलो अभियानाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क केला जात आहे.


६ एप्रिल रोजी भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपकडून “घर चलो अभियान” राबवण्यात आले. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजप पुणे शहरात ३ लाख घरांमध्ये एक विशेष पत्रक त्यावेळी वाटण्यात आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील देखील या अभियानात सहभागी झाले होते.  पुण्यातील महायुतीचे सर्व स्थानिक आमदारांनी देखील घरोघरी जात पत्रक वाटप केले होते.


दरम्यान, या माध्यमातून भाजपचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचण्याचा संकल्प करण्यात आला होता. साधारण पुण्यात १० ते १२ लाख नागरीकांना हे पत्रक वाटप करण्यात आले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.