"सिंहगड रोड भागातील प्रलंबित प्रश्नांवर काम करणार" रवींद्र धंगेकरांचे आश्वासन

 

सिंहगड रोड भागातील प्रलंबित प्रश्नांवर काम करणार रवींद्र धंगेकरांचे आश्वासन

पुणे: सिंहगड रस्त्यावरील पर्वती विधानसभा मतदारसंघात येणारा भाग हा पुणे लोकसभा मतदारसंघात येत असून, गेली अनेक वर्षे येथील नागरिक दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. उड्डाणपुलामुळे काही प्रमाणात वाहतूककोंडी कमी होणार असली, तरी इतर पर्यायी रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गुन्हेगारी, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक यांसारख्या प्रश्नांवर या भागात विद्यमान लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असून, खासदार म्हणून निवडून आल्यावर या भागातील प्रलंबित प्रश्नांवर काम करणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.


विठ्ठलवाडी येथील मंदिरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह धंगेकर यांनी दर्शन घेतले. विठ्ठलवाडी, विश्रांतीनगर, हिंगणे खुर्द, आनंदनगर, साईनगर, खोराडवस्ती, साईनगर, तुकाईनगर, समर्थनगर, माणिकबाग, रामनगर, आपटे कॉलनी, धनलक्ष्मी, महालक्ष्मी सोसायटी या भागांत धंगेकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा व जीपयात्रा काढण्यात आली होती.


यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह रवींद्र धंगेकर यांनी विठ्ठलवाडी येथील मंदिरात आवर्जून दर्शन घेतले. सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी, विश्रांतीनगर, हिंगणे खुर्द, आनंदनगर, साईनगर, खोराडवस्ती, साईनगर, तुकाईनगर, समर्थनगर, माणिकबाग, रामनगर, आपटे कॉलनी, धनलक्ष्मी, महालक्ष्मी सोसायटी या भागांत धंगेकर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा व जीपयात्रा काढण्यात आली. यावेळी माजी आमदार कुमार गोसावी, माजी नगरसेविका अश्विनी कदम, अभय छाजेड, आबा जगताप, चैतन्य पुरंदरे, बापू निंबाळकर, राजाभाऊ कदम,संतोष गोपाळ, अजय खुडे, महेश शिंदे, प्रसाद गिजरे, बाळासाहेब प्रताप, स्वराज गोसावी, रफिक शेख, राजू चव्हाण, लक्ष्मण रायकर, मिलिंद गवंडी, युवराज मदगे, विनोद देसाई, संदीप कडू, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.