देशाचे आणि राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभेची निवडणूक आज पार पडली आहे. बारामतीमध्ये थेट लढत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी असल्याचे दिसून पूर्णपणे दिसून आले. यामध्ये सुप्रिया सुळें विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत आहे. आज या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या आज म्हणजेच 7 मे रोजी खडकवासला परिसरातील एका मतदान केंद्रावर पोहचल्या. मतदान सुरु होण्यापूर्वी त्या औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रात इव्हीएम मशीनची पूजा केली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यानेच त्यांच्याविरोधात तक्रार केली असून रुपाली चाकणकर यांच्यावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व प्रकाराची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. ईव्हीएम मशीनची पूजा करतानाचा रुपाली चाकणकर यांचा फोटो राज्यभर एकदम व्हायरल झाला. त्यावरुन समाज माध्यमावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
दरम्यान, आज ईव्हीएमची पूजा केल्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्या रुपालीताई चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.