पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात दारू पिऊन सुसाट गाडी चालवत एका अल्पवयीन मुलाने दोघांचा जीव घेतला. हिट अँड रनच्या या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला. अल्पवयीन मुलाच्या हातात वडिलांनी कार दिलीच कशी, अनेकांनी उपस्थित केला. धनदांडग्या कुटुंबातील या अल्पवयीन मुलाला कुणाचाही धाक नसल्याचं समोर आलं आहे.
तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करू असेही स्पष्ट केले. त्यानंतरही जनतेत रोष कायम असून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीच या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. संतापलेल्या अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्या अल्पवयीन आरोपीला जामीनावर सोडल्याबद्दल त्यांनी ज्युवेनाइनल कोर्टालाही खडेबोल सुनावले आहेत.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस ? My heartfelt condolences to families of Aneesh Awadhiya and Ashwini Kostha .
The culprit #VedantAgarwal should be hard punished !
Shame on Juvenile Justice Board !#Pune
अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्था यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. दोषी वेदांत अगरवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे! बाल हक्क न्यायालयाची लाज वाटते ! अशा शब्दांत फटकारत अमृता फडणवीस यांनी ट्विट शेअर केले आहे. एकदंरच या घटनेवरून त्यांचा चांगलाच संताप झाल्याचे दिसत असून त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, हिट अँड रनच्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन मुलाच्या वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून त्यांना अटकही करण्यात आली आहे. आज अग्रवाल यांच्यासह त्यांच्या अल्पवयीन मुलाला कोर्टात हजर केलं जाणार आहे.