पुणे: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शुक्रवार २४ मे रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. त्यातच देखभाल दुरुस्तीची कामे, विद्युतविषयक कामांमुळे शुक्रवारी (ता. २४) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.
दि. २४ मे रोजी पुण्यातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती.
— PMC Care (@PMCPune) May 21, 2024
पाणी पुरवठा बंद असणारे भाग पाहण्यासाठी : https://t.co/Kidx6xgyZ4#WaterClosure #PMC pic.twitter.com/LAFNLXlsaH
पाणी विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी एक प्रेस नोट जारी करून म्हटले आहे की, "पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) काही पाण्याच्या टाक्या आणि जलशुद्धीकरण केंद्रांवर नागरी आणि विद्युत कामांचे नियोजन केले असल्याने शुक्रवारी अनेक भागांना पाणीपुरवठा होणार नाही, असे जगताप म्हणाले.
पर्वती एमएलआर टाकी, सर्व पेठा, पर्वती एचएलआर टाकी, पद्मावती, बिबवेवाडी, सॅलिसबरी पार्क, पर्वती एलएलआर टाकी, सिंहगड रस्ता आणि अंतर्गत समाविष्ट गावे, एसएनडीटी टाकी परिसरातील गोखलेनगर, शिवाजीनगर, वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, बावधन, पाषाण, संपूर्ण कोथरूड, गांधीभवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसार टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी परिसर, चतुःशृंगी टाकी परिसर, पाषाण पंपिंग व सूस गोल टाकी परिसर, लष्कर ते खराडी पंपिंग, लष्कर केंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्र, जागतिक पाणीपुरवठा योजना चिखली या भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.