महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रॅण्ड... एकेकाळी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं नाव आणि आगळी वेगळी चव... अस्सल मराठी मातीतलं दूध संकलित करून, ते ग्राहकांना पोहोचवणं ही एकेकाळची ख्याती... नाव एकच... महानंद... आता मात्र महानंदचं ते वैभव आता गुजरातला गेलंय...
महानंद डेअरीवरुन मागच्या काही दिवसांपासून विरोधकांनी घमासान केलं होतं. इतर उद्योगाप्रमाणे महानंददेखील गुजरातला हलवण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप केला होता. त्यानंतर आता 'महानंद'बाबत बातमी अली आहे. महानंद डेअरीचा ताबा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटकडे गेला आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांची उपकंपनी असणाऱ्या गुजरातचया मदर डेअरी यांना 'महानंद' चालवण्यासाठी देण्यात आली आहे. मात्र येथून निघणारे उत्पादन महानंदा नावाने असणार आहे.
महाराष्ट्रातील सहकारी दूधसंस्थांची शिखरसंस्था असलेला ‘महानंद’ खासगीकरणाच्या याच धोरणाचा बळी ठरला. महाराष्ट्र राज्य सहकारी दूधसंघ (महानंद) हे राज्यात ‘ऑपरेशन फ्लड’ अंतर्गत ९ जून, १९६७ रोजी स्थापन झालेला २५ जिल्हासंघ व ६० तालुका दूधसंघांचा शिखर ‘महासंघ’ असा महाकाय विस्तार होता.