“लढणार आणि जिंकणार पण”, पर्वती मतदारसंघात भाजपच्याच दोन नेत्यांमध्ये मोठी चुरस

 

Parvati-Vidhansabha-Election-Madhuri-Misal-vs-Shreenath-Bhimale

पुणे : पुणे शहारातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या माधुरी मिसाळ यांनी पुन्हा निवडणुकीसाठी दावा सांगितला आहे. तर दुसऱ्या बाजूला गेली पंधरा वर्षे विधानसभेची तयारी करत असलेल्या भाजपच्या श्रीनाथ भिमाले यांनी ‘लढणार आणि जिंकणार’, अशी भूमिका घेतल्याने मतदारसंघात भाजपचे दोन नेते आमनेसामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पर्वतीत भाजपच्याच नेत्यांमध्ये मोठी चुरस बघायला मिळत आहे.


माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत वाळवंटातील उदाहरण देत भिमाले यांना डिवचलं. सुरूवातीच्या काळात पर्वती मतदारसंघात भाजपचे १० नगरसेवक निवडून आलेत. त्यानंतर २३ नगरसेवक निवडून आलेत. असं म्हणत ज्यावेळी शेत सुपीक दिसायला लागतं. त्यावेळी सगळेजण त्यावर तुटून पडतात. आणि त्याआधी तिथे वाळवंट आहे. तेव्हा तिथे कोणी शेती करत नाहीत. असं म्हणत माधुरी मिसाळ यांनी शाब्दिक टोलेबाजी करत मतदारसंघावर आपला दावा सांगितला.


तर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते राहिलेले श्रीनाथ भिमाले यांनी देखील विधानसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. ते म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षापुर्वीच भाजपकडून आमदारकी मागितली होती. त्यावर वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत पक्षाचं काम करत आलो आहे. यातच आता लोकसभा निवडणुकीपासून मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाण्याचं निश्चित केलं आहे. त्यावर वरिष्ठांच्या कानावर देखील घातलं आहे की मला आता लढायचं आहे. त्याच अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. मला खात्री आहे की वरिष्ठ मला संधी देतील आणि मी लढणार पण आहेच आणि जिंकणार पण आहेच.

लढणार आणि जिंकणार ही आधी मिच टॅगलाईन दिली आहे. ज्याला आत्मविश्वास असतो तो सांगतो. असं म्हणत माधुरी मिसाळ यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देखील माहिती आहे की गेली पंधरा वर्षे मतदारसंघात काम करत आहे. अलिकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका असतील किंवा महापालिकेत सभागृह नेता म्हणून केलेलं काम यावरून वरिष्ठ नक्कीच मला संधी देतील. तसेच लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील माझ्याच भागातून सर्वात जास्त लीड दिलं आहे. त्यामुळे मला विधानसभेसाठी संधी मिळेल अशी खात्री असल्याचे श्रीनाथ भिमाले यांनी सांगितलंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.