पिंपरी: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने दरवर्षी “राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा" आयोजित केली जाते. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड आकुर्डी सावली हॉटेल मध्ये राष्ट्रीय गणेश उत्सव स्पर्धा निम्मिताने बैठक आयोजित केली होती. यावेळी विश्वस्त मंडळाच्या माणिकदादा चव्हाण यांच्या अध्यक्षेखालील या बैठकीचे औचित्य साधत ललित म्हसेकर यांची परीक्षक पदी फेर निवड करण्यात आली.
ललित म्हसेकर यांची पिंपरी चिंचवड शहरामधील गणेश मंडळांबरोबर असणारा दांडगा संपर्क पाहता तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट च्या योजना नागरिकांपर्यंत पोचून नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात मदतीचा हात देउन आधार देतात तसेच ललित म्हसेकर यांची काम करण्याची पद्धत देखिल उत्कृष्ठ आहे, तसेच ललित म्हसेकर हे उच्चशिक्षित बी टेक इंजिनियर असून एका खाजगी आयटी कंपनी मध्ये कार्यरत असून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून नागरिकांमध्ये यांची ओळख आहे.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रसाने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, अमोल केदारी, अक्षय गोडसे, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, बाबसाहेब ढमाले, जगदीश शेट्टी, संतोष ढोरे, राजाभाऊ गोलांडे, कैलाश भांबुर्डेकर, अनिल वाघिरे, दत्तात्रय भोंडवे, नंदकुमार सुर्यवंशी, पोपट रसाने इत्यादी पदाधिकारी व ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते