पुणे: सिंहगड रोड परिसरातील पु. ल. देशपांडे उद्याना शेजारी कलाग्राम आणि ॲम्पी थिएटर साकार होत असून यामध्ये एक्जीबिशन स्टॉल, फूड स्टॉल व प्रशस्त वाहनतळ आशा सोयी आहेत या प्रकल्पाचे काम जोरात आहे. ‘शहर, जिल्ह्यातील कलाकारांबरोबरच देशविदेशातील कलाकारांना कला सादर करण्यासाठी आणि विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘‘कलाग्राम’मध्ये ग्रामीण भागातील आठवडी बाजारासारख्या रचनेत हस्तकला वस्तूंची दालने उभारली जाणार आहेत. या ठिकाणी कलाकृती खरेदी करता येतील; तसेच कारागिरांचे प्रत्यक्ष कामही पाहता येईल. नृत्य-संगीतासाठी ‘ओपन थिएटर’ असेल. विविध राज्यांमधील खाद्यपदार्थांची दालनेही या ठिकाणी असतील. कलांचा आनंद घेत आणि चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत प्रियजनांबरोबर वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम सांस्कृतिक केंद्र असेल.
पुणे: विद्येचे माहेर घर म्हणून पुण्याची ओळख आहेतच, परंतु त्याचबरोबर पुणे हे एक कलेचे शहर म्हणून विख्यात आहे. या कलाकरांना आपल्या हक्काचं व्यासपीठ मिळावं, यासाठी ‘कलाग्राम’ हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.. याठिकाणी सर्व कलाकार एकत्र येऊन आपली कला सादर करू शकतात. त्याचसोबत लोकांनीही ही कला ऐकावी, पाहावी, यासाठी सुंदर वातावरणही तयार करण्यात आलं आहे. याचं काम जवळपास पुर्ण झालं आहे. अशी माहिती पर्वती मतदारसंघातील आमदार माधूरी मिसाळयांनी दिली आहे.
मागील काही वर्षांपासून पर्वती मतदारसंघात अनेक विकासकामे सुरू आहेत. समाजातील विविध घटकांचा विकास केला जातोच. परंतु त्याचबरोबर इतरांचाही मोठ्या प्रमाणात विचार केला जातो. याचाच भाग म्हणून पुण्यातील सर्व कलाकारांना आपल्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं, कलाकारांनी आपली कला सादर करावी, यासाठी कलाग्राममध्ये एम्पीथेटर तयार करण्यात आलं आहे. याठिकाणी असे १२ कॉलम आहेत. त्याठिकाणी कलाकार आपली कला सादर करू शकतात. याचीच पाहणी आज माधुरी मिसाळ यांनी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
दरम्यान, यातच ज्या कलाकरांना आपली कला सादर करायची आहे, यामध्ये मग कोणीही असो, कुणाला गाणं म्हणायचं आहे, कुणाला डॉन्स करायचं आहे, कुणाला काहीतरी बनवायचं आहे. अशा सर्व कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी देत आहोत. यासाठी थेट त्यांनी माझ्या इंस्ट्राग्रामवर मेसेज करा. आमच्या ऑफिसकडून तुम्हाला त्यासंदर्भात एक कॉल येईल आणि तुमची कला सादर करावी, त्यासाठी जास्तीत जास्त कलाकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माधुरी मिसाळ यांनी केलं आहे.
Kalagram Sankrutik Kendra, Kalagram Sinhagad Road, Kalagram Exhibition Center, Kalagram Food Festival, Kalagram Festival