रोहन मिथिला 1 को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटीने 270 kWp सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून दाखवली ग्रीन एनर्जीची दिशा

रोहन मिथिला 1 को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटीने 270 kWp सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून दाखवली ग्रीन एनर्जीची दिशा


पुणे : रोहन मिथिला 1 को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी, विमाननगर या सोसायटीने 270 kWp सोलर प्लांटचा प्रकल्प स्थापित करून शाश्वत ऊर्जेच्या  दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सोलर सिस्टीमद्वारे दरवर्षी 3 लाख 50 हजार युनिट स्वच्छ विजेचे उत्पादन होणार असून यामुळे  सोसायटीला दरवर्षी अंदाजे ₹40 ते 45 लाखांच्या जवळपास बचत होणार आहे. ही सोलर उर्जा वापरून सोसायटी 80% पर्यंत विजेची बचत करू शकते, ज्यामुळे रहिवाशांना पर्यावरणपूरक आणि आरामदायी जीवन जगता येईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम यशस्वीपणे पूर्ण करून आज पुण्यातील रोहन मिथिला 1 को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटीने समाजातील इतर सोसायट्यांपुढे एक आदर्श घालून दिला आहे.



सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर ओटी आणि सेक्रेटरी रेश्मा वायकर तसेच खजिनदार योगेश अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या कमिटी मेंबर्सच्या पुढाकाराने आणि दुरदृष्टीमुळे हे शक्य झाले आहे. स्विड सोलर, टाटा पॉवर सोलरचा चैनल पार्टनर या सोलर प्रकल्पाने सोसायटीला स्वच्छ उर्जेकडे वळण्याची संधी दिली; जेणेकरून सोसायटीला  पर्यावरणासह आर्थिक फायदाही होणार आहे. या प्रकल्पाची सर्वात विशेष बाब म्हणजे येत्या 3 वर्षांच्या आत या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च वसूल होतील. त्यानंतर सोसायटीला मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि वाढत्या विजेच्या खर्चापासून त्यांना दिलासा  मिळेल. या योजनेद्वारे रोहन मिथिला 1 ग्रीन एनर्जीच्या दिशेने अग्रेसर होत आहे आणि इतर सोसायट्यांना प्रेरणा देईल.



रोहन मिथिला 1 ने ग्रीन एनर्जीचा अवलंब करून एक उत्तम पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचा निर्णय घेतला आहे. 


Rohan Mithila, Rohan Mithila Vimannagar, 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.