सिंहगड रोड: सेवा सागर फाउंडेशनने जे समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नेहमीच कार्य करत असते, यावर्षीचा सेवा सागर फाउंडेशन आयोजित शिष्यवृत्ती प्रदान व पुरस्कार वितरण सोहळा वीर बाजी पासलकर सभागृह, सिंहगड रोड, पुणे येथे काल रविवार २२ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे, रमेश बापू कोंडे, ह भ प श्री विजय महाराज, नगरसेविका ज्योतीताई गोसावी, नगरसेवक प्रसन्न दादा जगताप, गिरीश खत्री, श्रीमती कल्पनाताई कवडी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे चारुदत्त क्षीरसागर यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर प्रास्ताविक केदार क्षीरसागर यांनी केले तसेच तरुणांना व्यक्तिमत्व विकासाबद्दल मार्गदर्शन केले व संस्थेच्या पुढील वाटचाली विषयी माहिती दिली. या कार्यक्रमात जवळपास पन्नास मुलांना व मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. समाजातील विविध क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा व्यक्तींना सेवा सागर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी श्रीमती कल्पनाताई कवडी यांनी "तरुण पिढीची मानसिकता: अपाय आणि उपाय" या विषयावर विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. रमेश बापू कोंडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उजाळा देत तरुणांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला. आणि तसेच ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे म्हणाले "समाजामध्ये समस्या अनेक आहेत, परंतु प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. विशेषतः तरुणांनी समाजकार्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे" तसेच, ह भ प विजय महाराज जगताप म्हणाले, समूहाने केलेली साधना हजार पट लाभते. शिक्षणाबरोबरच संस्काराची जोड असावी लागते तरच समाजाची प्रगती होते"
याप्रसंगी नेताजी बाबर, मंदार रायकर, संतोष पासलकर, सचिन चव्हाण, मकरंद कुलकर्णी, दीपक पाटील, घनश्याम वाळुंजकर, रवी शिंदे, रमेश भोज, लक्ष्मण वाशिवले, सुरेंद्र दळवी, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेनकर यांनी केले तर प्रा. विजय मराठे यांनी आभार प्रदर्शन केले.
सेवा सागर पुरस्कार्थी खालील प्रमाणे:
१. महिला सक्षमीकरण विभाग: डॉ. पल्लवी प्रसाद
२. आरोग्य विभाग: सौ प्रीती मस्के
३. क्रीडा विभाग: पै. धनराज भरत शिर्के
४. शैक्षणिक विभाग: प्रा. गणेश कोंढाळकर
५. पर्यावरण संवर्धन: श्री किशोर मोहोळकर
६. समाज सेवा: श्री विक्रम कसबे
७. वैद्यकीय सेवा: डॉ. मयूर कर्डिले
८. कृषी विभाग: श्री सतीश खैरे
९. कला विभाग: चित्रकर्ती चारू वखारकर
१०. विशेष पुरस्कार: भुगाव नागरिक मंच