"पुण्यात होणार सर्वात मोठा रुद्र पूजन सोहळा" शिव तांडव सोहळ्याची घेता येणार अनुभूती

 

The-Biggest-Rudra-Pujan-Ceremony-to-be-held-in-Pune-Experience-Shiva-Tandav


पुणे: श्रावण महिन्याच्या सांगतेनिमित्त, पुण्यात १ सप्टेंबर रोजी, शेवटच्या श्रावणी सोमवारी, एक अनोखा आणि भव्य रुद्र पूजन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील, तसेच भाजप कोथरूड विधानसभेचे सरचिटणीस गिरीश खत्री यांच्या शिवस्व प्रतिष्ठानतर्फे आयोजित या महोत्सवात १००१ दाम्पत्यांचा सामूहिक रुद्र पूजन सायंकाळी ४ वाजता महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर येथे पार पडणार आहे.


या पूजन सोहळ्याच्या प्रमुख आकर्षणांमध्ये रुद्राभिषेक, शिव मंत्रांचा जप, आणि रुद्र पूजनानंतर शिव तांडवाचे विशेष आयोजन आहे. अयोध्याधाम येथील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठेचे मुख्य पुरोहित वेदशास्त्रसंपन्न सुजित देशमुख (गुरुजी) यांच्या हस्ते या पूजनाचा विधी संपन्न होणार आहे. या महोत्सवाला राष्ट्रसंत प. पु. गुरुवर्य ह. भ. प. भाऊ महाराज परांडे आणि ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे शुभ आशीर्वाद लाभणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व भक्तांना या महोत्सवात सपत्नीक सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे पुण्यातील हा सोहळा भक्तिमय वातावरणात रंगणार आहे.. 

या विशेष सोहळ्यासाठी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आणि भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.