महिलेकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न, मंत्रालयात खळबळ उडाली

unknown-women-try-to-vandalize-bjp-leader-deputy-cm-devendra-fadnavis-office-in-mantralaya


महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे. एका अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला. तोडफोडीचा प्रयत्न केला. मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या नावाची पाटी आहे. ही पाटी काढून फेकून दिल्याची माहिती आहे.



विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स समाज माध्यमावर याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे. याच कार्यालयाबाहेर एक महिला गृहमंत्र्यांच्या नावाची पाटी तोडून आपला राग व्यक्त करतांना व्हिडीओत दिसत आहे. एकीकडे सरकारचे लाडक्या बहिणीचे इव्हेंट सुरू आहेत तर दुसरीकडे एक महिला मंत्रालयात येऊन संतापाने नावाची पाटी फोडत आहे.. राज्यातील ही दोन चित्र खूप काही सांगून जात आहेत




मुंबईत संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरु होता. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची घरी निघण्याची लगबग सुरु होती. त्यावेळी हा प्रकार घडला. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे. एक अज्ञात महिलेने फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरची नावाची पाटी काढून फेकून दिली. त्यानंतर कार्यालयात घुसून आरडाओरडा केला. तिथे असलेल्या कुंड्या फेकल्या. गोंधळ घातला. त्यानंतर तिथून पसार झाली.


या घटनेनंतर ही महिला पसारही झाली. ही महिला कोण होती, ती कशासाठी आली होती? ती पसार कशी झाली आदी प्रश्नांची उत्तरे आता पोलीस प्रशासन शोधत आहे. परंतू, एकंदरीतच उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात घुसून गोंधळ घालत, तोडफोड करत बिनदिक्कत ही महिला बाहेरही कशी पडली, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.