"कोथरूडकरांचे आरोग्यदूत: चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्य सेवा मजबूत"


Kothrudkar-s-health-Chandrakant-Patil-s-initiative-to-strengthen-health-services


पुणे : अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह आरोग्यही मुलभूत गरजच. आरोग्य समृद्ध समाजाचा पायाच असतो. म्हणूनच कोथरूडकरांना मूलभूत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य समजणारे आमदार म्हणजे चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. एकही रुग्ण उपचारांपासून वंचित नाही, याचे समाधान वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले. चंद्रकांत पाटील यांनी आज धनत्रयोदशी म्हणजेच, धन्वंतरी देवतेच्या पूजनाच्या शुभ मुहूर्तावर, भगवान धन्वंतरींच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आरोग्य, सुख आणि समृद्धी नांदो ही सदिच्छा व्यक्त केली.

फिरता दवाखाना, आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरे, गुंतागुंतीच्या आजारावर उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखापर्यंतची मदत चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कोथरूडकरांसाठी सांधे, मणके तसेच स्नायूंच्या समस्या दूर करण्यासाठी मोफत आयुर्वेदिक सल्ला शिबिर चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीदिनानिमित्त नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीरही चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून घेण्यात आलंय.

कोथरूडमधील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी नेहमीच पाटील यांनी घेतली. कोविड काळात देखील पाटील यांनी वैद्यकीय मदत, पीपीई किट वाटप केले. त्यामुळे नेहमीच गरजूना मदतीचा हात पुढे करणारे चंद्रकांत दादा हे कोथरुडकरांचे आरोग्यदूतचं म्हणावे लागतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.