पुणे: प्रत्येक स्त्री हे देवीचे स्वरूप आहे, असे मानून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सातत्याने मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. राज्यात मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. राज्यासह त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात देखील महिलांच्या बाबतीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. हेच ऋणानुबंध वेळोवेळी भक्कम होत गेले. याचाच भाग म्हणून कोथरूडच्या या लेकींसाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्या कडून कन्या पुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कोथरूड मतदारसंघातील लेकीबाळींसाठी ११ आँक्टोंबर २०२४ रोजी कन्या पुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 'नारी तु नारायणी' असे म्हणत पुण्यातील शुभारंभ लॉंन्स, डी.पी. रोड म्हात्रे पुलाजवळ संध्याकाळी साडेचार वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जास्तीत जास्त लेकीबाळींनी सहभागी व्हावं, असं आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, चंद्रकांतदादा आमदार झाल्यापासून कोथरूड मतदारसंघात अनेक मोठे निर्णय महिलांच्याबाबतीत घेण्यात आले आहे. यामध्ये कोथरूडच्या मुलींसाठी सुकन्या योजनेचे खाते उघडणे, दर महिन्याला या खात्यात मुलीच्या पालकांनी पैसे भरावे, यासाठी स्वतः काही प्रोत्साहनपर रक्कम भरणे, मुलींना शैक्षणिक फीची मदत, तिला खेळाडू म्हणून लागणारी मदत, तिचे शारीरिक-मानसिक स्वास्थ टिकून रहावे यासाठी 'मानसी' सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
तसेच सध्याच्या परिस्थितीला प्रत्युत्तर म्हणून तिला स्वसंरक्षण प्रशिक्षण, वैद्यकीय मदत, तसेच एखाद्या गरजू लेकीच्या लग्नासाठी लागणारी भांड्यांची (झाल) मदत देणे असे अनेक उपक्रम गेल्या काही वर्षात अविरत चालू आहेत. अजूनही काही उपक्रमांचे भविष्यात प्रयोजन असल्याचे त्यांनी सांगितले आहे.