एमआयटी विद्यापीठाचा ‘राजा माने’ यांना समर्पित जीवन पुरस्कार

Life-Award-dedicated-to-Raja-Mane-by-MIT-University-Pune


पुणे: पुण्याच्या एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या वतीने राजा माने यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी "समर्पित जीवन गौरव पुरस्कार" जाहीर करण्यात आला आहे. राजा माने हे संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. माने हे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कार्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात एक नवीन दिशा मिळाली आहे.


हा पुरस्कार राजा माने यांच्या दीर्घकालीन सेवेसाठी आणि पत्रकारितेत केलेल्या योगदानासाठी देण्यात येत असून, तो एक प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. लोणी काळभोर येथे होत असलेल्या जागतिक विश्र्वशांती परिषदेत दि‌. ४ ऑक्टोबर रोजी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे संयोजक एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड व भारताच्या महासंगणकाचे जनक शास्रज्ञ डॉ.विजय भटकर यांनी कळविले आहे.


जगातील शास्त्रज्ञ,तत्त्वज्ञ आणि विश्र्वशांती चळवळीतील विचारवंत सहभागी होत असलेल्या दहाव्या जागतिक विश्र्वशांती परिषदेचे आयोजन दि.३,४ व ५ ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर येथील विश्वराज बाग येथे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.