मावळ मध्ये भाजपचे काही नेते पक्षाची साथ सोडणार...?

Maval-Vidhansabha-Maval-BJP-and-mahayuti-conflicts


पुणे: मावळ तालुका हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या अनेक वर्षापासून मावळ तालुक्यात भाजपचं वर्चस्व राहिले आहे. याच तालुक्याला भाजपने अनेक संधी दिल्या.या संधीचं सोनं करत भाजपच्या नेत्यांनी देखील भाजपचा बालेकिल्ला राखण्यामध्ये गेली 25 वर्ष मिळवलं होतं. परंतु 2019 च्या निवडणुकीमध्ये पुर्वाश्रमीचे भाजपचेच सुनील शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी दिली आणि भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त झाला. आता मात्र 2019 नंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींचे मावळ तालुक्यात पडसाद उमटताना पाहायला भेटत आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून मावळ तालुक्यात सुनिल शेळके यांना उमेदवारी अद्याप तरी जाहीर झाली नसली तरी भाजपच्या नेत्यांनी मात्र विद्यमान आमदार सुनिल शेळके यांचे काम करणार नाही,अशी भूमिका घेतल्यामुळे मावळ महायुतीत फूट पडणार असल्याचे मागील काही दिवसांपासून दिसत आहे.



 

मावळ भाजपचा कार्यकर्ता हा पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे.अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतात.परंतु हेच नेते आता स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपला इतरांच्या दावणीला बांधताना पाहायला दिसत आहेत. भाजपमधील ज्येष्ठ नेते हे भाजपतील कार्यकर्त्यांचा कोणताही विचार न घेता, पक्षाचे होणारे नुकसान न पाहता वैयक्तिक स्वार्थाचे निर्णय घेताना सध्या पाहायला भेटत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला कितीही नुकसान झाले तरी चालेल, पार्टीचा राज्यामध्ये मुख्यमंत्री नाही झाला तरी चालेल, पार्टीला राज्यात घवघवीत यश आलं नाही तरी चालेल, परंतु मावळ तालुक्यातील नेत्यांची पोळी भाजली पाहिजे याकडेच त्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला दिसतंय.




भाजपमध्ये प्रबळ आणि सुनिल शेळके यांना लढत देणारा उमेदवार म्हणून रवींद्र भेगडे यांच्या रुपाने असताना देखील ते मात्र आपल्या पक्षातील उमेदवाराची ताकद वाढवण्याऐवजी, आपल्या पक्षातील उमेदवाराला कार्यकर्त्यांना आणि मतदारांना इतर नेत्यांच्या दावणीला बांधताना आपल्याला पाहायला दिसत आहे, अशा नेत्यांवरती कारवाई का होऊ नये असा सवाल आता सर्वसामान्य कार्यकर्ते भाजपचे विचारू लागले आहेत. तर काही सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र कमळ हाच आपला उमेदवार आहे.परंतु या निवडणुकीत जर कमळ या चिन्हाचा उमेदवार नसेल तर आम्ही महायुतीचाच धर्म पाळु असं देखील सर्वसामान्य कार्यकर्ता बोलताना दिसुन येत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.