पुणे: भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जातोय, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारणारे मयूर मुंडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मुंडे यांनी 2021 साली पुण्यात औंध येथे मोदींचं मंदिर बांधलं होतं. त्यांनी आपल्या राजीनाम्यात सांगितले की, भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून निष्ठावान कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केलं जात आहे आणि बाहेरील नेत्यांना जास्त महत्त्व दिलं जातंय. त्यामुळे पक्षातील निष्ठावंतांची गळचेपी होत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
शिवाजीनगरच्या आमदाराने निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. आता भाजपचे कार्यकर्ते आणि श्री नमो फाउंडेशनचे मयुर मुंडे यांनी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर आरोप केले आहेत. यासोबतच मयूर मुंडे यांनीही भाजपला रामराम केला आहे. मयुर मुंडे यांनी 2021 मध्ये औंधमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले होते. ते म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करत आहे. मी विविध पदांवर प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र भाजप आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत आहे. इतर पक्षातून येणाऱ्यांना पक्ष महत्त्व देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे मयुर मुंडे म्हणाले. मी पीएम मोदींचा कट्टर समर्थक आहे आणि त्यांच्यासाठी काम केले आहे पण आमच्यासारख्या लोकांना पक्षात स्थान नाही म्हणून मी पक्ष सोडत आहे. मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर वरिष्ठ नेत्यांना आपला राजीनामा पाठवला आहे, ज्यामध्ये त्यांनी पक्षाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात बाहेरील नेत्यांचं वाढतं इनकमिंग आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या कामकाजाकडे होणारी दुर्लक्ष, हे त्यांच्या राजीनाम्याचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं आहे