व्यावसायिकांना सुवर्णसंधी! बालेवाडीत दिवाळीच्या खरेदी- विक्रीसाठी "दिवाळी शॉपिंग फेस्टिवल"चे आयोजन

 Organized-Diwali-Shopping-Festival-in-Baner-Balewadi-Area-on-19th-and-20th-October


पुणे: वर्षातील सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी, आता अगदीच उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. दिवाळीत खरेदी न करणारी व्यक्ती विरळच. लोकांच्या खरेदीच्या उत्साहाला द्विगुणित करण्यासाठी बाजारपेठादेखील सज्ज होत असतात. दिवाळीच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'ग्रीन अँपल एक्सहिबिशन'ने बालवाडीत दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
 

दरवर्षीप्रमाणे बालवाडीत १९ आणि २० ऑक्टोबर दरम्यान "दिवाळी शॉपिंग फेस्टिवल"चे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकणी एकाच छताखाली सर्वाना आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. हा दिवाळी फेस्टिव्हल बालवाडी येथील, दसरा चौकातील, आठवडे बाजार ग्राउंडवर सकाळी  ११.३० ते रात्री ९.३० पर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे. बाणेर-बालेवाडीकरांना मनसोक्त खरेदी आणि लज्जतदार पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली दोन दिवस मिळणार आहे. 

https://www.sinhagadtimes.com/2024/10/Organized-Diwali-Shopping-Festival-in-Baner-Balewadi-Area-on-19th-and-20th-October.html



या "दिवाळी शॉपिंग फेस्टिवल" मध्ये प्रामुख्याने दिवाळीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू, हॅन्डमेड पणत्या, उटणे, आकाशकंदील, दिवाळी फराळ, तोरण, शुभेच्छा बॉक्स,  महिलांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या विविध प्रकारच्या साड्या पैठणी, कांजीवरम, डिझायनर साड्या, ज्वेलरी, पंजाबी सूट्स, प्लाझो, फाब्रिक डिझाईनर साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, लॉन्ग आणि शॉर्ट कुर्तीज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, लहान लहान मुलांसाठी लाकडी खेळणी  बेडशीट, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, ऑरगॅनिक प्रॉडक्ट, शोभेच्या वस्तू, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, लोणच्यांचे विविध प्रकार, दर्जेदार गावरान आणि घरगूती मसाले, पापड कुर्डाई, शोभेच्या वस्तू, रेडी टू कुक फूड्स, मातीची भांडी, होम डेकोरच्या वस्तू , मातीच्या शोभेच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, बांबू व खनापासून बनवलेले आकाश दिवेतसेच  खास खवय्यासाठी खाद्य मेजवाणीमध्ये, थालीपीठ, पुरणपोळी, खर्डा भाकरी, खांडोळी, डोसा, पाणीपुरी, स्प्रिंग पोटॅटो, सोलापुरी भाकरी, चिकन, बिर्याणी, वडा-कोंबडा उपलब्ध असे स्टॉल असणार आहेत. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला भेट देत असतात.

अश्या या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्या महिला आणि व्यावसायिकांना एकत्र करत ग्रीन अँपल एक्सहिबिशन हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. तसेच व्यवसायावर असणाऱ्या कुटुंबांना आपल्या स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना हातभार लावण्याचेही काम ग्रीन अँपल एक्सहिबिशन करत आहे. 


उद्योजकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी बिजनेस प्रोमोट करण्याची सुवर्णसंधी
हिंजवडी आय. टी. जवळील बाणेर बालेवाडी परिसर आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून झपाट्याने विकसित झाला आहे. या परिसरातील लोकांच्या रोजच्या जीवनातील गरज लक्षात घेऊन बाणेर-बालेवाडीकारणांसाठी खास संक्राती शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून व्यावसायिकांसाठी बाणेर-बालेवाडी परिसरात बिझिनेझ प्रोमोट करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आपणही आपला बिझनेस या लोकांपर्यंत या फेस्टिवलच्या माध्यमातून पोहचवू शकता. तसेच या पुढेही ऑनलाईन सेवा देऊ शकता तरी या फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी  ९८५०३०४१६६ या नंबर वर संपर्क करावा.



लहान मुलांसाठी खास आकर्षण
या फेस्टिव्हल मध्ये लहान मुलांसाठी खास आकर्षण असणारे लांब पायाचे स्टिल्ट वॉकर, आणि जोकर यांची लहान मुलांच्या करमणुकीसाठी तसेच जम्पिंग आणि किड्स बॉऊन्सिंग टोटली फ्री असणार आहे. त्याच बरोबर थोरामोठांसाठी "ये शाम मस्तानी" हा सदाबहार गाण्यांचा प्रोग्रॅमही असणार आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.